Maharashtra Cold : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात थंडीने जोरदार आगमन केले असून पुणे, धुळे आणि जळगावसह अनेक शहरांमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. पुणेकरांना चांगलाच गारठा जाणवत असून, 'विशेष म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही पुण्यात जास्त थंडी' असल्याची नोंद झाली आहे. पुण्यातील हवेली परिसरात तापमान १३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर महाबळेश्वरमध्ये पारा १९.६ अंशांवर आहे.
राज्यात सर्वात कमी तापमान धुळे येथे ८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्याखालोखाल जेऊरमध्ये १०, जळगावमध्ये १०.५ आणि परभणीत १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान कायम राहून किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढू शकतो.
गेले तीन-चार दिवसात पुणे शहरातील किमान तापमानात घट झाली आहे.परिणामी शहरात थंडी वाढली आहे तर पुढील तीन ते चार दिवस किमान तापमान आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या हंगामातील हे आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले आहे. पुणे आणि परिसरात गेले काही दिवसापूर्वी किमान तापमान 20°c च्या दरम्यान नोंदविण्यात आले होते, मात्र यामध्ये आता मोठी घट झाली आहे, शहरात काल रविवार 14.3 संशय तापमान नोंदवले गेले.तर आज 16 अंश सेल्सिअस आहे.
गेल्या 2 दिवसापासून अमरावतीत कडाक्याची थंडी जाणवते आहे.. या थंडीमुळे अमरावतीच्या तापमानात घट झाली आहे.. अमरावतीचा पारा 18 अंशावर आहे.. सकाळी नागरिकांना हुडहुडी भरणारी थंडी आहे.. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत..एका ठिकाणी बसून नागरिक एकत्र येत शरीराला उभ मिळण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत..सकाळी फिरताना अंगात उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडताना दिसते आहे..थंडी पासून संरक्षण करण्यासाठी नागरिक सकाळी चहावर ताव मारताना दिसताहेत..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.