

Shiv Sena leader Shivaji Sawant quits Shiv Sena and joins BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच एकनाथ शिंदेंना भाजपने जोरदार धक्का दिला आहे. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मोठ्या भावाने शिवसेनेला रामराम ठोकला आहे. शिवाजी शिंदे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत यांच्या रूपाने शिंदेंच्या शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
शिवाजी सावंत यांच्यासोबतच अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपकडून सोलापूरमध्ये ऑपरेशन लोटस सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अजित पवार आणि शरद पवार यांना धक्का दिल्यानंतर आता शिंदेंच्या बड्या नेत्याला फोडले आहे. शिवाजी शिंदे यांनी शिवसेनेसाठी मोठे योगदान दिलेय. शिवसेना सोलापूरमध्ये वाढवण्यात सावंतांचा मोठा वाटा आहे. आता सोलापूरमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय.
शिवाजी शिंदे यांच्यासोबत सोलापूरमधील कुर्डूवाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे १३ माजी नगरसेवक, करमळ्याचे 4 नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये बुधवारी मुंबईमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. राज्यात नगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय.
भाजपकडून सोलापूरमध्ये ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तानाजी सावंत यांचे मोठे बंधू शिवाजी सावंत गेल्या काही दिवसांपासून वेटिंगवर होते. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. १ नोव्हेंबर रोजी शिवाजी सावंत हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.