Narayan Rane Vs Uday Samant Saam Tv
महाराष्ट्र

Konkan Politics: कोकणात भाजप-शिंदे गटात शितयुद्ध, राणे-सामंतांचं बॅनर वॉर

Narayan Rane Vs Uday Samant: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राणे आणि सामंत यांच्यातील राजकीय संघर्ष आता बॅनर वॉरपर्यंत पोहचलाय. भाजप आणि शिंदे सेना एकमेकांना इशारे देत आहे.

Girish Nikam

लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोकणात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कुरबुर सुरू झाली आहे. नारायण राणेंचा विजय झाल्यानंतर राणे कुटुंब शिंदे गटाविरोधात चांगलंच आक्रमक झाल्याचं दिसतंय. राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंतांमध्ये बॅनर वॉर रंगलंय.15 जून रोजी कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचा 'वक्त आने दो...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे' अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला होता.

या बॅनरवर उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा फोटो होता. हेच बॅनरवॉर आता उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील पाली या गावात पोहोचले आहे. 'बाप बाप होता है. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है,' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी सामंतांच्या रत्नागिरी मतदारसंघावर निलेश राणे यांनी दावा ठोकला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी आपण कोकणातून शिवसेना संपवली, असे विधान केलं होतं.

उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र शेवटच्या क्षणी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यापूर्वी सामंत बंधू आणि राणेंमध्ये समेट घडवण्यात आला होता. मात्र राणेंच्या विजयानंतर संघर्षानं पुन्हा डोकं वर काढलं. कणकवलीत राणेंचं अभिनंदन करणारा बॅनर लावण्यात आला होता. यावरील किरण सामंत आणि जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा फोटो अज्ञातांनी फाडला. उदय सामंत यांच्या मतदारसंघात राणे यांना मताधिक्य मिळाले नाही. रत्नागिरी, चिपळून, राजापूर विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले. माजी खासदार निलेश राणे यांनी तर थेट सामंत बंधूवर आरोप करत निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता.

राणेंनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राऊतांचा पराभव केला. मात्र त्यांनी विधान करताना शिवसेना संपवल्याचं नमूद केलं. त्यामुळे सामंतांविरोधातला संघर्ष पाहता राणेंचं पुढचं टार्गेट कोकणातून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं आहे की काय असा प्रश्न पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT