coca cola project in ratnagiri uday samant addressed media saam tv
महाराष्ट्र

Uday Samant : तेव्हा अनिल परब यांनी पळ काढला : उदय सामंत

उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी आज चिपळुण येथे माध्यमांशी संवाद साधला.

अमोल कलये

Ratnagiri News :

मी उद्याेग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोको कोला याचा प्राेजेक्ट उभारला जात आहे. या माध्यमातून हजाराे युवकांना राेजगाराची संधी उपलब्ध हाेणार असल्याची माहिती उद्याेगमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी दिली. (Maharashtra News)

चिपळूण मधील वशिष्टी नदीतील टप्पा क्र. १ बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री सामंत म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंधराशे कोटीचा कोको कोला उद्योग उभारला जात आहे. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिला उद्योग रत्नागिरी जिल्ह्यात आणण्यात आला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भूमीपूजनाला येण्याची शक्यता मंत्री सामंत यांनी व्यक्त केली. वर्षभरामध्ये अनेक कंपन्या कोकणामध्ये उद्योगासाठी आलेल्या असतील असेही त्यांनी नमूद केले.

माजी पालकमंत्र्यांनी पळ काढला

दरम्यान त्यापूर्वी चिपळूण मधील वशिष्टी नदीतील (vashishti river) टप्पा क्र. १ बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. आ शेखर निकम, मा.आ.सदानंद चव्हाण, आमदार रमेश कदम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, बचाव समितीचे बापू काणे, अरुण भोजने, उदय ओतरी, प्रशांत यादव तसेच नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन वर्षापूर्वी चिपळूणला पूर (floods in chiplun) आला तेव्हा माजी पालकमंत्री अनिल परब (anil parab) यांनी पळ काढला अशी टीका कार्यक्रमात मंत्री सामंत यांनी केली. ते म्हणाले त्यादिवशी सकाळी 6.30 वाजता अधिकारी यांची बेठक घेतली.

सामंतांचा गाैप्यस्फाेट

या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी मुंबईला जाण्यासाठीचा मार्ग विचारला आणि चिपळूणकरांना वाऱ्यावर सोडून परब गोवा मार्गे मुंबईला गेले. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले हा मोठा गाैप्यस्फाेट म्हणा की आणखी काय पण मी आज त्यावेळची वस्तुस्थिती सांगितली असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT