CNG News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur CNG Price : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! नागपुरात CNG च्या दरात वाढ

नागपुरात सध्या पेट्रोल-डिझेल पेक्षाही CNG महाग

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur CNG Price : एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असताना, दुसरीकडे आता सीएनजीच्या (CNG) दरातही वाढ होत आहे. नागपूरात CNG च्या दरात तब्बल सहा रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार नागपुरात CNG चे दर आता 114 रुपये किलो इतके झाले आहे. दहा दिवसांत CNG चे दर सहा रुपयांनी वाढल्याने वाहन चालकांच्या खिशाला जास्तच कात्री बसणार आहे. (Nagpur Latest CNG Price)

पुणे, नाशिक, मुंबई या भागात ‘सीएनजी’चे दर नागपूरपेक्षा जवळपास ३० ते ३५ रुपये किलोने स्वस्त आहेत. नागपुरात सध्या पेट्रोल-डिझेल पेक्षाही CNG महाग विकले जात आहे. नागपुरात पेट्रोल 106 रुपये आणि डिझेल 92 रुपये लिटर विकले जात आहे.

नागपुरात ‘सीएनजी’ची थेट ‘पाईपलाईन’ नसल्यामुळे येथे दर जास्त असल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे. नागपुरात हरियाणा सिटी गॅस या कंपनीचे विक्रेते रॉमॅटचे चार पंप आहेत. केवळ याच पंपावर ‘सीएनजी’ची विक्री केली जाते. या पंपांची संख्या वाहनांच्या तुलनेत कमी असल्याने नेहमीच या पंपावर कारचालकांच्या मोठ्या रांगा दिसतात. यामुळे CNG वर चालणाऱ्या वाहन चालकांना आर्थिक फटका बसला आहे. (Maharashtra News)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारणं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT