Uddhav Thackeray News Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : आज CM ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादच्या नामांतराची घोषणा?

उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादेत जाहीर सभा

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) वातावरण तापलं असतानाच, दुसरीकडे आज (8 जून) औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी देखील केली आहे. मात्र, त्याआधीच भाजपने पोस्टरबाजी करुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (CM Uddhav Thackeray Aurangabad Rally)

शहरात ज्या-ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे पोस्टर लागले आहे. त्या-त्या ठिकाणी भाजपने पोस्टर लावून शिवसेनेला खिचवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आजच्या सभेत मुख्यमंत्री हे भाजप आणि राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. (Uddhav Thackeray News)

मशिदीवरील भोंगे प्रकरणावरून राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर तसेच शिवसेनेवर टीकेचा भडिमार केला होता. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत हिंदू जननायक अशी प्रतिमा निर्माण केली. आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमक्या कोणत्या विषयावर हात घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने औरंगाबादेत होणारी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या सभेला येण्यासाठी पहाटे क्रीडांगणापासून ते भाजी बाजारातही पत्रके वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या सभेला एक लाख मतदार औरंगाबाद शहरातून उपस्थित राहतील असा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.

दरम्यान मराठवाडय़ातील शिवसेना नेत्यांच्या बैठका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतल्या आहेत. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची ताकद सभेतून दाखविण्याचा बुधवारी प्रयत्न होणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठावर छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचे फोटो असायचे. मात्र, या वेळेस मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा पुतळा उभारण्यात आल्याने आजच्या सभेत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगरची घोषणा उद्धव ठाकरे करतील काय यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Fast: उपवासात लिंबू पाणी चालतं का? जाणून घ्या सत्य

Nagpur: बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'ची फाईल, नागपुरमधील 'त्या' VIDEO मुळे उडाली खळबळ

Nag Panchami Fast: नाग पंचमीला स्त्रिया भावासाठी उपवास का करतात?

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

SCROLL FOR NEXT