कोणताही आमदार फुटणार नाही, महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार : उद्धव ठाकरे

बैठक संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
Uddhav thackeray
Uddhav thackeray Saam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने त्यांच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं. बैठक संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. (CM Uddhav Thackeray News In Marathi)

Uddhav thackeray
महाविकास आघाडीच्या आमदारांची अवस्था मांजरांच्या पिल्लांसारखी; रावसाहेब दानवेंची टीका

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठकीत तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत महाविकास आघाडीच्या आमदारासहित अपक्ष १२ आमदार होते. बैठक संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील. कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीच्या चारी उमेदवार उमेदवार निवडणून राज्यसभेवर जाणारच. ही लढाई शंभर टक्के जिंकणार. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या विजयानंतर जल्लोष करणार. कोणताही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Uddhav thackeray
चिंताजनक! तिसरी लाट ओसरल्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचा आकडा इतका वाढला

दरम्यान, राज्यातील राज्यसभेच्या या जागेवर २२ वर्षांनी ही निवडणूक होत आहे, यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले,ही विचित्र गोष्ट आहे. आपण परंपरा पाळत आलो आहोत. सभ्यता आणि राजकारण दोन्ही परस्पर विरोधी असल्यातरी राजकारणात थोडीफार सभ्यता असायला हरकत नाही. आता आठवावं लागत आहे की, शेवटची राज्यसभा निवडणूक कधी झाली होती. एक परंपरा पाळायला हरकत नव्हती'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com