Chief Minister Manohar Lal Khattar Video saam tv
महाराष्ट्र

Manohar Lal Khattar Video: हा आप कार्यकर्ता आहे, त्याला फटके द्या अन् बाहेर फेका... भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा आदेश

Chief Minister Manohar Lal Khattar Viral Video: आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याला फटके देण्याचे आदेश देताना दिसत आहे. भर कार्यक्रमात खट्टर यांनी हे आदेश दिले. त्यांच्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायर होत आहे.

Chandrakant Jagtap

Chief Minister Manohar Lal Khattar Video : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रविवारी नव्या वादात सापडले आहेत. त्यांच्या 'जनसंवाद' कार्यक्रमादरम्यानचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओ ते आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याला फटके देण्याचे आदेश देताना दिसत आहे. भर कार्यक्रमात खट्टर यांनी हे आदेश दिले. त्यांच्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायर होत असून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओथ तुम्ही पाहून शकता. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर एका सभेला संबोधित करत आहे. यादरम्यान ते नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. नागरिकांना काही सूचना असतील तर नक्की सांगा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर तक्रार मांडण्यासाठी उभा राहिलेल्या एका व्यक्तीला ते हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे असं म्हणत त्याला बाहेर फेकण्याचे आदेश दिले, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते एका वृद्ध महिला तक्रारदाराला शांत राहण्यास सांगताना दिसत आहे. हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाले असून खट्टर यांना टिकेचा सामना करावा लागत आहे.

आप कार्यकर्त्याला फटके देण्याचे आदेश

जनसंवाद कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री जनतेच्या समस्या ऐकून घेतात आणि जागेवरच सोडवतात. जनसंवादात मुख्यमंत्र्यांनी राज्य व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, संत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना ही केंद्रे चालवण्याची जबाबदारी सोपविली जाईल. याचा उद्देश तरुणांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य मार्गावर आणणे आहे. यावर काही सूचना असतील तर मांडा असे ते म्हणाले.

त्यानंतर एका व्यक्तीने उभा राहून बोलण्याचा प्रयत्न करताच खट्टर यांनी त्याला अडवले आणि 'या राजकारण करू देऊ नका, तो राजकारणी आहे, आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता, त्याला उचला आणि फटके देऊन बाहेर फेकडून द्या', असे आदेश खट्टर यांनी दिले. (Latest Breaking News)

वृद्ध महिलेलाही गप्प बसलण्यास सांगितले

दरम्यान याच कार्यक्रमाचा आणखी एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यात मुख्यमंत्री एका वृद्ध महिलेला “आता तू थांब, बस... कुठूनतरी तू शिकून आली आहेस, गप्प बस' असे म्हणत गप्प बसण्यास सांगत आहे. हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर मुख्यमंत्री वादात सापडले आहेत. (Latest Political News)

आपची मुख्यमंत्री खट्टर यांच्यावर टीका

आप नेते अनुराग धांडा यांनी मनोहर लाल खट्टर यांनी वापरलेली भाषा कोणत्याही मुख्यमंत्र्यांची असू शकत नाही असे म्हटले आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये ते म्हणाले “आपचे कार्यकर्ते प्रत्येक सार्वजनिक संवाद कार्यक्रमात तुम्हाला प्रश्न विचारतील. काल तुम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सिरसा येथे ताब्यात घेतले आणि आज डबवलीत आमच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण केली. भाजपचा जनसंवादाचा प्रचार आम्ही चालू देणार नाही. आमचे कार्यकर्ते कार्यक्रमाला जाऊन जनतेसमोर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतील, असेही ते म्हणाले.

हा जनसंवाद आहे का?

दुसर्‍या ट्वीटमध्ये धांडा म्हणाले की, "ड्रग्समुळे आपला मुलगा गमावलेली एक वृद्ध महिला अंमली पदार्थांचे सेवन थांबवण्याची विनंती करत आहे, तर मुख्यमंत्री निर्लज्जपणे म्हणताहेत की कोणीतरी त्यांना असे म्हणण्यास सांगितले." हा जनसंवाद आहे का? असा सवाल देखील धांडा यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT