Mallikarjun Kharge News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना कोर्टाचे समन्स; 100 कोटींच्या...
Mallikarjun Kharge Summons : पंजाब येथील संगरूर येथील कोर्टाने १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना समन्स बजावले आहे. हिंदू सुरक्षा परिषदेचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी खरगेंच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.
कर्नाटक निवडणुकांदरम्यान बजरंग दलाच्या विरोधात अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. कोर्टाने खरगे यांना १० जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
१०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा
हिंदू सुरक्षा परिषदेचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. बंजरंग दलाची तुलना राष्ट्रविरोधी संघटनांशी केली आणि कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्यात येईल, अशी टिप्पणी केली होती, असे भारद्वाज यांचे म्हणणे आहे.
भारद्वाज म्हणाले की, 'घोषणापत्रातील पान क्रमांक १० वर काँग्रेसने बजरंग दलाची तुलना देशद्रोही संघटनांशी केली आणि निवडणुका जिंकल्या तर बजरंग दलावर बंदी घालण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मी याविरोधात कोर्टात धाव घेतली.' (Latest Political News)
१० जुलैपर्यंत कोर्टासमोर हजर राहा!
या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने प्रकरण सूचीबद्ध केले आहे. न्यायालयाने मल्लिकार्जुन खरगे यांना या प्रकरणात १० जुलै रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली होती. त्यात काँग्रेसचे सरकार आल्यास पीएफआय आणि बजरंग दल यांच्यावर बंदी घातली जाईल, असे आश्वासन दिले होते, असा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.