Manasvi Choudhary
कांदा पोहे खायला सर्वानाच आवडतात. कांदापोहे घराघरातील प्रसिद्ध नाश्ता आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? कांदा पोहे बनवताना काही गोष्टीची काळजी घेतल्यास ते चविष्ट लागतात.
पोहे भिजत घालताना ते कोणत्याही भांड्यात भिजत न घालता चाळणीत भिजत घाला यामुळे ते चिकट होत नाही.
चाळणीत पोहे धुतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही मीठ घाला, साखर आणि हळद मिक्स करा यामुळे पोह्यांना चव येते.
कांदापोहे बनवताना कांदा नेहमी मध्यम आकारात आणि उभा चिरावा. कांदा परतताना तो खूप लाल किंवा करपवू नका
फोडणीच्या सुरुवातीला शेंगदाणे तेलात तळून बाजूला काढून ठेवा. पोहे पूर्ण तयार झाले की वरून शेंगदाणे टाका
पोहे फोडणीत मिक्स केल्यानंतर कढईवर २-३ मिनिटे झाकण ठेवा आणि मंद आचेवर एक वाफ येऊ द्या. यामुळे पोहे कडक होणार नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.