sameer wankhede
sameer wankhedeSaam Tv

Sameer Wankhede FIR: आर्यन खानकडे आधी २५ कोटी मागितले, नंतर १८ कोटींवर फायनल, टोकन म्हणून घेतले ५० लाख

रक्कम ठरल्यावर त्यांना आधी टोकन देण्यात आले. टोकनची रक्कम ५० लाख रुपये होती.
Published on

Sameer Wankhede FIR Update: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थांप्रकरणी एसीबीचे माजी अधिकारी समिर वानखेडे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच आता त्यांनी आर्यनच्या कुटुंबाकडून किती पैशांची मागणी केली होती याची माहिती समोर आली आहे. (Crime News)

समोर आलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला अंमली पदार्थांप्रकरणी सोडण्यासाठी तत्कालीन एनसीबीचे झोनल डारेक्टर समिर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम देण्यास आर्यनचे कुटुंबीय तयार नसल्याने यात वाटाघाटी करण्यात आली आणि ही रक्काम १८ कोटी करण्यात आली. रक्कम ठरल्यावर त्यांना आधी टोकन देण्यात आले. टोकनची रक्कम ५० लाख रुपये होती.

sameer wankhede
Pune Crime News: पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

या आधी वानखेडे यांच्या मुंबई येथील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. वानखेडे यांच्या गोरेगाव पश्चिमेकडील इम्पेरियल हाइट्स या इमारतीच्या सी विंगमधील घरी सीबीआयची टीम १२ मे रोजी पोहचली होती. या टीममध्ये ३ अधिकारी होते. सीबीआयची ही चौकशी पहाटे ५ पर्यंत सुरु राहिली.

साल २०२१ मध्ये शाहरुख खान पूत्र आर्यन खान याला कॉड्रेलीया क्रूज शिपवर अटक करण्यात आली होती. अंमली पदार्थांप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान यावेळी समिर वानखेडे मोठे चर्चेत आले होते.

sameer wankhede
Gadchiroli Accident News: पाण्याने केला घात; एकाच गावातील ४ तरुणांचा गुदमरून मत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com