Eknath shinde news  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : 'टीका करणाऱ्यांना पायरीवर आणलं'; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Eknath shinde news : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. विधीमंडळातही शिवसेनेच्या दोन्ही गटाचा संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर आज शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर जोरदार टीका करण्यात आली. 'महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवस सहकुटुंब विश्रांतीसाठी महाबळेश्वर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी महाबळेश्वरच्या राजभवन येथे सातारा प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी काय उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत याचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा खरपूस समाचार घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी या राज्याचे विकास करायचे कंत्राट घेतलं आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा एक प्रमुख आहे. त्यामुळे त्याच्यावर किती टीका करायची हे त्यांनी ठरविले पाहीजे. टीका करणाऱ्यांना पायरीवर आणलं ना. चार दिवस पायऱ्यावर कोण होते ? हे आपण पाहिले'.

सातारा जिल्ह्याच्या विकासाकामावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी पूल उभा करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. फॉरेस्टच्या काही अडचणी होत्या, मी त्या अधिकाऱ्यांशी बोललो.दळणवळण झालं पाहिजे असं सांगितले. महाबळेश्वरमधील ट्रॅफिक, रस्ते आणि अनेक मुद्यावर चर्चा झाली. या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्याचा आढावा घ्यावा लागेल. मी इथल्या प्रश्नासंदर्भात मी अधिकारी आणि मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत'.

'महाबळेश्वरचा मास्टर प्लॅन तयार आहे, त्याला आम्ही मान्यता देत आहे. जिल्ह्यात बाळासाहेबांचे स्मारक उभं करण्यात येत आहे, त्याला मी निधी मंजूर केला आहे. उन्हाळ्यात जे पाण्याचे दुर्भिक्ष होतं, ते संपविण्यासाठी काही योजना करत आहोत. दुर्गम भागात मोठ्या एसटीपेक्षा मिनी बस सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कास - बामणोली हा रस्ता 'सीआरएफ'मधून व्हावा, यासाठी मी प्रयत्न करतोय. कोकण -पश्चिम महाराष्ट्र जोडला जावा म्हणून दोन पूल उभे करणार. बोट रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

पुण्यामध्ये सत्ता मिळविताना झालेला संघर्ष देखावा बंदी घातली आहे, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, आत्ता सत्ता परिवर्तन झालं आहे. त्यामुळे त्याची गरज नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दया दरवाजा तोड दो! CID चा मुहूर्त ठरला; चोर पोलिसांचा खेळ पुन्हा सुरू,कधी अन् कुठे पाहा

Maharashtra Election Results : राष्ट्रवादी- शिवसेना फूट भाजपच्याच पथ्यावर, काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Horoscope Today: आज उजळणार 3 राशींचं नशीब; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT