Eknath shinde and uddhav thackeray Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : मी उंटावरुन शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टाेला (video)

Siddharth Latkar

Satara :

राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी राहिला पाहिजे ही आमची धारणा आहे. त्यामुळेच दिवस रात्रं एक करुन आम्ही जनतेसाठी कार्यरत आहाेत. विराेधकांनी कितीही काही बाेलले तरी त्याकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही. आम्ही कामातून उत्तर देत आहाेत. मी उंटावरुन शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही असे आज (शनिवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) टाेला लगावला. ते पाटण येथील कार्यक्रमात बाेलत हाेते. (Maharashtra News)म

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मी आजही जमिनीवर चालताे, कालही मी कार्यकर्ता हाेताे आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता असणार. सर्व सामान्य लाेकांचे कल्याण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले विरोधकांची पायाखालची वाळू आता सरकली आहे. त्यामुळेच ते आम्हांला चोर चोर असे म्हणत रडगाणे गात आहेत. आम्ही विरोधकांना कामातून उत्तर देत आहाेत. आम्ही बाळासाहेब यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहाेत. आम्ही जे निर्णय घेताे ते गोरगरीबांच्या हिताचे घेताे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. संकट काळात जनतेला मदत करणारे आमचे सरकार आहे. काही लाेक आमच्यावर आराेप करताहेत पण उंटावर शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही जनेतत जाऊन त्यांच्यासाठी कार्य करणारा हा मुख्यमंत्री असल्याचे आज पुन्हा एकदा शिंदेंनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: ओल्या केसांमध्ये सिंदूर का लावू नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT