Anand dighe and eknath shinde
Anand dighe and eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde | CM शिंदे यांचं आनंद दिघे यांच्यावर मोठं विधान; ' त्यांच्यासोबत काय झाले, त्याचे...'

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांकडून शिवसेना पक्षावर दावा केला जात आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. त्यानंतर 'धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा आम्ही केवळ चित्रपट काढत त्यांनी काम काय केले हे दाखवले आहे. पण त्यांच्यासोबत काय झाले, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. वेळ आली की मी सगळं सांगेल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Eknath Shinde News In Marathi )

आमदार आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा सुरू आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्याचा दौरा सुरू केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मालेगाव येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही भाजपसोबत गेलो. अडीच वर्षात हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले. शिवसेनेच्या सरकारमध्ये शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले हे मान्य आहे का ?', असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचे आस्तित्व धोक्यात आले. आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले, पण आम्हाला दुर्दैवाने यश आले नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांवर प्रेम करणारे शिवसैनिक आहात. आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली'.

'आम्ही कधी वर्षातून दोन-दोन वेळा परदेशात गेलो नाही. स्वत: मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले. मग विश्वासघात कोणी केला ?, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

'धर्मवीर आनंद दिघे यांचा आम्ही केवळ चित्रपट काढत त्यांनी काम काय केले हे दाखवले आहे. पण त्यांच्यासोबत काय झाले, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत, वेळ आली की मी सगळं सांगेल, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत मालेगावच्या सभेत मोठं विधान केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips: स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

IRCTC Hotel Service: रेल्वेची नवीन सुविधा...स्टेशनवर मिळणार अवघ्या १०० रुपयांत रुम

Kareena Kapoor: करीना कपूर बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावनिक पोस्ट करत स्वत:च दिली माहिती

SCROLL FOR NEXT