Maharashtra Cabinet Meeting  Saam Tv
महाराष्ट्र

फडणवीस सरकारचे ८ मोठे निर्णय, महाराष्ट्रातील ४ शहरांना होणार फायदा; मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Maharashtra Government: आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सरकारने अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबई, नाशिक, अकोला, सोलापूर या जिल्ह्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

Priya More

Summary -

  • मंत्रिमंडळ बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले.

  • नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.

  • सोलापूर महिला कामगार गृहनिर्माण योजनेस मुद्रांक व नोंदणी शुल्क सवलत देण्यात आली.

  • वसई विरार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पाला गती आली आहे.

  • मुंबई अंधेरी MHADA पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ८ मोठे निर्णय घेण्यात आले. आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग, गृह विभाग आणि गृहनिर्माण विभागाअंतर्गत सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती येणार आहे. तसंच, मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोण कोणते निर्णय घेण्यात आले त्यावर आपण नजर टाकूया...

आरोग्य विभाग -

शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी.

परिवहन विभाग -

नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती. या १९६.१५ कि.मी. नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मधील रुपांतरणाच्या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

महसूल विभाग -

अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलाला जागा. मौजे अकोला येथील २४ हजार ५७९.८२ चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी.

महसूल विभाग -

सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील कॉ. मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासककाच्या माध्यमातून बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.

महसूल विभाग -

वसई विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीसाठी आचोळे ( ता. वसई, जि. पालघर) येथील जमीन देण्यास मंजुरी.

महसूल विभाग -

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, नाशिकरोड यांना मौजे देवळाली (ता.जि. नाशिक ) येथील १०५५.२५ चौ.मी. जमीन देण्यास मान्यता.

गृह विभाग -

मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह स्वीकारला. तसेच अहवालातील निष्कर्ष, समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश.

गृहनिर्माण विभाग -

मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर (एसव्हीपी नगर) येथे म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प राबवणार. याठिकाणच्या १२२ संस्थांच्या, तसेच ३०७ वैयक्तिक भुखंडावरील ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितले उपाय, एकदा वाचाच...

Cars Price Dropped: कारचं स्वप्न होणार पूर्ण; जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर 'या' कंपनीच्या कार झाल्या स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पो आणि टँकरचा अपघात

Oxidised Jewellery Look: नवरात्रीचा लूकला करा खास; घागरा चोलीवर ट्राय करा या ट्रेण्डी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

Special Trains: कन्फर्म तिकीट! दिवाळीसाठी १२००० विशेष ट्रेन; प्रत्येक मार्गावर फटाफट मिळतील रेल्वे

SCROLL FOR NEXT