Dhanshri Shintre
जिओ ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन्स उपलब्ध आहेत. याशिवाय, कंपनी काही खास ऑफर्ससह अतिरिक्त फायदे देणाऱ्या योजना देखील देते.
हा खास प्लान जिओ स्टार्टर पॅकसोबत दिला जातो. केवळ ₹३४९ रिचार्जमध्ये उपलब्ध असून तो यूजर्सना अतिरिक्त लाभ देतो.
हा प्लॅन फक्त ₹३४९ योजनेचे फायदेच देत नाही, तर यूजर्सना अनेक अतिरिक्त सेवा आणि सुविधाही पुरवतो.
₹३४९ रिचार्जमध्ये यूजर्सना दररोज २GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएसची सुविधा दिली जाते.
या योजनेची वैधता २८ दिवस आहे. यूजर्सना अमर्यादित ५G डेटा आणि ९० दिवसांसाठी JioHotstar प्रवेशाचा लाभ मिळतो.
ही सेवा टीव्ही आणि मोबाईलवर उपलब्ध असून, एकावेळी केवळ एका डिव्हाइसवरच वापरण्याची परवानगी दिली जाते.
JioHotstar चा ९० दिवसांचा टीव्ही प्लॅनही ३४९ रुपयांचा आहे. म्हणजेच ₹३४९ रिचार्जवर तुम्हाला ₹३४९ प्लॅन मोफत मिळतो.
याशिवाय, या प्लॅनमध्ये Jio AI क्लाउडवर ५०GB स्टोरेज दिले जाते. वर्धापनदिन ऑफरमुळे यासोबत अनेक अतिरिक्त फायदेही मिळतात.
वर्धापनदिन ऑफरमध्ये ग्राहकांना दोन महिने JioHome मोफत ट्रायल, JioHotstarचा प्रवेश आणि अनेक अतिरिक्त फायदे मिळतात, ज्यामुळे प्लॅन अधिक आकर्षक ठरतो.