रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

Maharashtra Mahayuti Politics: रायगडनंतर आता नंदुरबारमध्येही महायुतीत फूट पडल्याचं चिन्हे आहेत. येथील भाजप आमदाराने स्थानिक निवडणुकीत स्वबळाचा नारा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीला धक्का दिलाय.
Maharashtra Mahayuti Politics
BJP MLA Vijaykumar Gavit refuses alliance with Shiv Sena in Nandurbar ahead of local elections, intensifying Mahayuti tension.saamtv
Published On
Summary
  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपविरोधात काम केलं.

  • शिवसेनेशी युती न करायचा निर्णय

  • नंदुरबार विधानसभा आणि अक्कलुकवा धडगाव विधानसभा मतदारसंघात महायुती तुटणार?

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी तेढ निर्माण झालीय. या निवडणुकीत युती,आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. जेथे शक्य आहे तेथे महायुती म्हणून निवडणूक लढा तर जेथे शक्य नाही तेथे मैत्रीपूर्ण लढत करायची, असं ठरल्यानंतर अनेक ठिकाणी महायुतीत वाद होताना दिसत आहे. आता रायगडनंतर नंदुरबारमध्ये महायुतीत तडा गेल्याचं दिसत आहे.

येथील भाजप नेते शिवसेनेवर नाराज आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेने भाजपविरोधात काम केलं, असा आरोप भाजप आमदार डॉ. विजय कुमार गावित यांनी केलाय. त्यामुळे शिवसेनेविरुद्धात दंड थोपटले आहेत. आगामी स्थानिक स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती न करायचा निर्णय भाजप आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी घेतलाय.

नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभेत युती शक्य नाही - भाजप आमदार

आमच्या वरिष्ठ नेतृत्वांनी आम्हाला सांगितलेले की, ज्याला युती जमत असेल त्यांने युती करा, ज्याला युती जमत नसेल त्यांनी जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा. त्यामुळे नंदुरबार विधानसभा आणि अक्कलुकवा धडगाव विधानसभा मतदारसंघात आम्ही महायुती करणार नाही, असं भाजप आमदार माजी मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी स्पष्ट केलंय. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पक्षश्रेष्ठींनी सागूनही शिंदे गटाने भाजपाच्या विरोधात काम केले.

Maharashtra Mahayuti Politics
Pune Metro News : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रो टप्पा-2 ला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्या समवेत युती न करता स्वतंत्र लढण्याची आमची भुमिका असल्याचे डॉ विजयकुमार गावित म्हणाले आहेत. आज त्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार तालुक्यातील चार गावच्या अनेक गावकरी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

Maharashtra Mahayuti Politics
Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आलेत. आता कर्जतमध्ये पु्न्हा सेना राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झालाय. आगामी निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांना शह देण्यासाठी रणनिती आखली जातेय. रायगडच्या कर्जत - खालापूर मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आलेत. त्यांनी परिवर्तन आघाडी काढलीय. कर्जतमधील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत आघाडी न झाल्याचे सांगितलंय. मात्र स्थानिक राजकारणात या परिवर्तन आघाडीची चर्चा जोरात सुरूय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com