Ladki bahin Yojana CM devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

'लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज...' मुख्यमंत्री फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हणाले?

Ladki Bahin Scheme to Remain Uninterrupted: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार, ही योजना बंद होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Bhagyashree Kamble

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील फलटण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मुख्य म्हणजे उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर तरूणी आत्महत्याप्रकरणाबाबतही त्यांनी भाष्य केलं. 'भगिनीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही', असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी योजनेबाबतही माहिती दिली. लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. या योजनेचा फायदा सामान्य महिला वर्गाला झाला. दरम्यान, महायुतीचं सरकार आल्यानंतर या योजनेत काही निकष लावण्यात आले. या निकषांमुळे लाखोंच्या संख्येनं महिला अपात्र ठरल्या. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार, असं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

मात्र, लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होणार नाही. सातत्यानं काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार. पण जोपर्यंत महायुती आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही', असं मुख्यमंत्र्यांनी सभेत ठणकावून सांगितलं.

'लाडकी बहीण महिलांसाठी आहे. लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज सातत्याने मिळत राहिल. हा विश्वास यावेळी मी देतो', असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी सभेत शेतकरी आणि विविध योजनांबाबतही भाष्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

SCROLL FOR NEXT