रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींवर गंभीर आरोप केले.
राजकीय दबाव आणि दादागिरीचा आरोप करण्यात आला.
या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
पुण्यातील ड्रग्स प्रकरण असो, पोर्शे कार प्रकरण असो किंवा गुन्हेगारी त्यावरून रवींद्र धंगेकरांवर आवाज उठवत असतात. पुण्यातील ड्रग्स प्रकरणावरून धंगेकरांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. शहरातील गुन्हेगारीवर आवाज उठवणाऱ्या धंगेकरांवर राजकीय दबाव आणला जातोय. त्यांच्यावर दादागिरी केली जातेय, असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय.
पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. निलेश घायवळ सोबत भाजपचे नेते राम शिंदे यांचे हेवेदावे आहेत. त्यांच्याच दबावातून कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या भावाला म्हणजेच सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाला असावा, असा आरोप केला होता.
त्यानंतर स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचार सभेत निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांचे नाव घेत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला होता. आता रोहित पवार यांनी आणखी एक मोठा आरोप केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रवींद्र धंगेकर यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय.
रवींद्र धंगेकर यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. घायवळ देशातून पसार झाल्यानंतर धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर संशयाची सुई नेली होती. ते शहरातील गुन्हेगारी विरोधात आवाज उठवत आहेत, मात्र त्यांचा आवाज दाबला जातोय. मुख्यमंत्री फडणवीस त्यांना त्यांची तक्रार त्यांच्या नेत्याकडे करण्याची धमकी देत आहेत दुसरीकडे अजित पवार त्यांना ते कोणत्या पक्षात आहेत त्याची आठवण करून देत असल्याचं रोहित पवार म्हणाले.
तू शांत बस नाहीतर मी तुझ्या बॉसशी बोलतो, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धंगेकरांना म्हणत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार धंगेकर विसरले आहेत की ते काँग्रेसमध्ये नाहीत. हे दोन्ही नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर प्रेशर आणायचा प्रयत्न करत आहेत. जो माणूस लोकांच्यावतीने गुंडागिरी विरोधात बोलत आहे. त्यांचा आवाज सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय.
आज तुमच्याकडे पॉवर आहे. तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्याकडे पॉवर आहे. पण या पॉवरचा वापर सत्तेसाठी न करता, जो नेता गु्न्हेगारीविरोधात बोलतो तो आवाज दाबण्या करता न करता, त्या नेत्याला विश्वासात घ्या, हाताशी घ्या, पुण्यातली गुंडागिरी कसं कमी करता येईल यावर चर्चा करा यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज बंद करण्याकरता गुन्हेगारी या शहरातून कशी संपेल यासाठी प्रयत्न करावेत. पण सरकार तसे करताना दिसत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.