
महायुतीतील तीनही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.
भाजप आणि शिंदे गट काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करतील.
अजित पवार गटाने जळगावसह काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झालीय. पक्षप्रवेशाचे कार्यक्रमांनी जोर धरलाय. जो तो पक्ष मोर्चेबांधणीमध्ये गुंतलाय. या निवडणुकांवरून महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरू झालीय. कोण किती भारी कोणाची ताकद किती हे दाखवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. जेथे होतील तेथे युती नाही तर मैत्रीपूर्ण लढत अशी घोषणा तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठांकडून करण्यात येत आहे. त्याचदरम्यान बहुतेक ठिकाणी तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्याने निवडणुका लढण्याचं ठरवलंय.
जालन्यात भाजपनं एकट्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची ठरवलंय. आता अजित पवार गटदेखील आपली ताकद दाखवणार आहे. जळगावमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ताकद दाखवणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी याबाबत संकेत दिलेत. ते जळगावमध्ये बोलत होते.
जळगाव जिल्ह्यात महायुती झाली तर ठीक नाहीतर आगामी जिल्हा परिषद , नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही आपली ताकद दाखवणार असं विधान त्यांनी केले आहे. काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे मनसेला सोबत घेत मविआत निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे महायुतीमधील पक्ष एकमेंकांना आपली दाखवण्यावरून चुरस रंगलीय.
अनिल पाटील यांनी यांनी जळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलीय. विधानसभा, लोकसभेत आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा का? हे न शोभणारे आहे. महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे. त्यामुळे युती झाली तर ठीक, नाहीतर आम्ही सुद्धा ताकद दाखवू असं अनिल पाटील म्हणालेत.
दरम्यान काही दिवसापूर्वी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनीही महायुतीतून निवडणूक लढल्या जाव्यात अशी मागणी केली होती. जर युती तुटली तर खाली गावपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाईल. त्यांचे खच्चीकरण होईल असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.