Sangli Rada  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli: पाटलांच्या समर्थकांचा राडा, मतदान केंद्राबाहेर भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; VIDEO व्हायरल

Sangli Rada Video: सांगलीमध्ये रोहित पाटील आणि संजयकाका पाटील समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. याचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. मतदान केंद्राबाहेरच हा प्रकार घडला. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

Priya More

Summary -

  • तासगाव मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपामुळे दोन गट आमनेसामने आलेत

  • रोहित पाटील आणि संजयकाका पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली

  • पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून वाद मिटवला

  • या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. या मतदानावेळी अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून राडा, हाणामारी झाल्याच्या घटना देखील घडल्या. सांगलीमध्ये देखील बोगस मतदान झाले. या बोगस मतदानावरून सांगलीत रोहित पाटील आणि संजयकाका पाटील यांचे समर्थक आमने- सामने आले. मतदान केंद्राबाहेर पाटलांच्या समर्थकांनी जोरदार राडा केला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार वादावादीचा प्रकार घडला. तासगाव येथील एका बुथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला. तसेच विरोधकांनी हातातील मतदार याद्याही हिसकावल्याचा त्यांनी आरोप केला.

यानंतर तातडीने आमदार रोहित पाटील हे देखील संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गट वेगवेगळे केले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर पुन्हा संतापल्या, मुक्ताईनगरमध्ये शिंदे गट आणि भाजपचा हायव्होलटेज राडा|VIDEO

Virat-Anushka: विराट आणि अनुष्काचे अनसीन रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

SCROLL FOR NEXT