Awhad vs Padalkar Saam TV News
महाराष्ट्र

Politics: आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणारा मकोका आरोपी? पडळकरांचा खास माणूस कोण?

Awhad vs Padalkar: महाराष्ट्र विधीमंडळात गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आमनेसामने भिडले. लॉबीमध्ये हाणामारी, मकोका गुन्हेगारांचा सहभाग, दोघे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.

Bhagyashree Kamble

विधिमंडळ परिसरात गुंडशाही पाहायला मिळाली. पडळकर विरूद्ध आव्हाड या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. शाब्दिक बाचाबाचीनंतर हाणामारी झाली. विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. यात त्यांनी आमदार गोपीचंद पडळकरांनी दिलेल्या धमक्यांचा उल्लेख केला. या विधानानंतर गोपीचंद विरूद्ध आव्हाड यांच्या कार्यकर्ते विधानभवनाच्या लॉबीमध्ये भिडले. दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पडळकरांचा कार्यकर्ता सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप केला आहे.

'ज्यांनी मारहाण केली, ते मकोकातील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली होती', असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 'मकोकाचे आरोपी विधीमंडळात येतात. राडा घालतात. हे संसदीय लोकशाहीचं मंदिर आहे. आतमध्ये बऱ्याच गोष्टींवरून वाद होतात. मात्र, बाहेर येऊन मिळवून घरी जातात. ही सभागृहाची परंपरा आहे. मकोकाचा आरोपी विधीमंडळ परिसरात येतो. मारहाण करतो. आम्ही मान खाली घालून जायचं का?' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विधीमंडळात गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्या तुफान वाद झाला. नितीन देशमुख पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर तुटून पडले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेनंतर देशमुखांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, नितीन देशमुख कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक म्हणून नितीन देशमुख यांची ओळख आहे. ते आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. पवार कुटुंबावर टिका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांवर त्यांनी आतापर्यंत त्यांनी अनेकदा शाब्दिक वार केले आहेत. गेली १५ वर्षांपासून नितीन देशमुख राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहेत. ते घाटकोपर भागाचं प्रतिनिधीत्व करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT