Mumbai Police issues Look Out Circular against CJP president Abhijeet Dipke Ranka, Das 
महाराष्ट्र

CJP नेत्यांच्या अडचणी वाढणार; सौरभ दास, अभिजीत दीपके, आशुतोष रांकाविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

CJP Leaders In Trouble संविधान दिनानिमित्त नागपुरात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने रॅली काढण्यात आली. दरम्यान गांधी जयंतीला मुंबईत विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी सीजेपीच्या तीन नेत्यांविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केलंय.

Bharat Jadhav

  • संविधान दिनानिमित्त नागपुरात कॉकरोच जनता पार्टीची भव्य रॅली

  • सीजेपीच्या अभिजित दीपके यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून एलओसी जारी

  • सीजेपीच्या नागपूर रॅलीनंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या अडचणी वाढणार?

संविधान दिनानिमित्त कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) तर्फे नागपुरात आज रॅली काढण्यात आली. सीजेपीच्या या मोर्चात हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र दुसऱ्याबाजुला सीजेपीचे प्रमुख नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.मुंबई पोलिसांनी सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात 'लुक आऊट सर्क्युलर' (LOC) जारी केलंय.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तिघांनी गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन केले होतं. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी हे 'लुक आऊट सर्क्युलर' जारी करण्यात आलंय.

सौरभ दासविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी

सीजेपी नेता सौरभ दासच्या विरोधात गुरुवारी लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आलंय. महाराष्ट्र पोलीस दलाच्या विनंतीनंतर सर्कुलर जारी करण्यात आलंय. अशी माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिल्ली हाय कोर्टाला दिली.

ब्रिटेनला जाणाऱ्या सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आलं, त्यानंतर सौरभ दास यांनी याविरोधात उच्च न्यायालयााच दरवाजा ठोठवलाय. दास २३ नोव्हेंबर रोजी ब्रिटेन येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार होते. परंतु त्यांना दिल्ली विमानतळावरच रोखण्यात आलं होतं. यानंतर सौरभ दास यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलीय.

सीजीपेचे प्रमुख नेते का अडचणीत आले?

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सीजेपीनं मुंबईत आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आली होती. यात सीजेपीच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात दीपके, रांका, दाससह प्रणव अहिरे, अजिंक्य शिंदे, अफरीन नवाझ, सौम्या कोर्डे, अंकित भारद्वाज, विजय मलंगी, योगेश इंगळेसह ४०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या एफआयआर मध्ये भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलमान्वये १८९ आणि २२३ कलम लावण्यात आलाय. हे मुद्दे बेकायदेशीर जमाव आणि लोकसेवकाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे पालन न करण्याशी संबंधित आहेत. यासह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ आणि १३५ चाही उल्लेख करण्यात आलाय. हे कलम सुव्यवस्था राखण्यासाठी लादलेल्या निर्बंध आणि पोलीस आदेशांच्या उल्लंघन करण्यासाठी लावण्यात येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, महिन्याभरात 22 हजार रुपयांनी स्वस्त

Maharashtra News Live Update: मांगले बाजारपेठेत भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

1 Gram Gold Chain: सुंदर अन् रोजच्या वापरासाठी परफेक्ट, पाहा १ ग्रॅम सोन्याच्या चेनचे ७ स्टायलिश ट्रेंडी डिझाइन्स

ॲग्रीस्टॅकमुळे राज्यातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांना डिजिटल ओळख; देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Benefits of Soaked Peanuts: स्वस्तात मस्त आरोग्याचा खजिना! रोज सकाळी खा भिजवलेले शेंगदाणे, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT