ABHIJIT DIPKE ANNOUNCES CJP AS A POLITICAL PRESSURE GROUP AFTER DELHI JANTAR MANTAR PROTEST Saam Tv
महाराष्ट्र

Abhijeet Dipke : आंदोलन केलं, यश मिळालं पण आता पुढे काय? अभिजित दीपके यांनी भूमिका केली स्पष्ट

Abhijeet Dipke Exclusive Saam Tv Interview : दिल्लीतील जंतर-मंतर येथे ३६ दिवस चाललेल्या आंदोलनानंतर CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत मोठी घोषणा केली. CJP हा राजकीय दबाव गट म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी साम टीव्हीच्या मुलाखतीत स्पष्ट केले.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे ३६ दिवस चाललेल्या आंदोलनानंतर CJP ने पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली

  • अभिजित दिपके यांनी CJP हा राजकीय दबाव गट म्हणून कार्य करणार असल्याच म्हटलं

  • देशातील न्यायव्यवस्था आणि विविध घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली

  • आंदोलनामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या

दिल्लीतील जंतर मंतर येथे ३६ दिवस झालेल्या आंदोलनानंतर सरकार नरमल आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. हे आंदोलन CJP संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. दरम्यान हे आंदोलन संपलं आता पुढे काय? हे आंदोलन कोणत्या दिशेने जाणार? राजकारणाकडे जाणार, समाजकारणाकडे जाणार? असा प्रश्न अभिजित दिपके यांना साम टीव्हीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी उत्तर देत म्हटलं की आमचा गट हा राजकीय दबाव गट असला पाहिजे.

साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी CPJ चे संस्थापक अभिजीत दिपके यांची 'ब्लॅक अँड व्हाईट' मुलाखत घेतली. या मुलाखतीत दिपके यांनी देशातील राजकीय परिस्थिती, न्यायव्यवस्था, लोकशाही, आंदोलन, भाषेचा वापर आणि गुन्हे दाखल करण्याच्या पद्धतीसह विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.या मुलाखतीत दिपके यांना आंदोलनाच्या यशानंतर पुढे काय? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटल, आमचा ग्रुप हा पॉलिटिकल प्रेशर ग्रुप असला पाहिजे. याचं कारण असं आहे की, जेवढे आंदोलनात लोक आले, त्यांच्याशी मी रोज बोलत होतो. रोज समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की या लोकांच्या मनात काय चाललंय आणि ते कशामुळे येतायत, तर त्यात मला एक असं जाणवलं की आपल्या देशात जी सध्याची स्थिती आहे. मग आपण जर इलेक्शन पाहिलं, ज्युडिशरी पाहिली, मीडिया पाहिली, इलेक्शन कमिशन पाहिलं किंवा ईडी, सीबीआय पाहिली हे जेवढ्या एजन्सीज आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा गव्हर्मेंट असो वा पॉलिटिकल पार्टीज असोत, लोकांचा कशावरच भरोसा नाही राहिला.

लोकांचा ज्युडिशरीवरचा विश्वास उडाल्याची खंत अभिजित दीपके यांनी मुलाखतीदरम्यान मांडली. ते म्हणाले, लोकांचं असं झालंय की ज्युडिशरी आमच्यासाठी नाहीये, ती कोणासाठी आहे? सामान्य माणसाला न्याय भेटत नाही. पण दुसरीकडे आम्ही पाहिलं, जिथं आमदारांची खरेदी-विक्री होते, त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय घेतो आणि तो रुलिंग पार्टीच्या हिशोबानेच देतो. त्याच्यामुळे ज्युडिशरीवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, माझी जबाबदारी आता वाढली आहे. पण आता मागे वळून पाहणार नाही. मला आता CJP ला पुढे न्यायचं आहे. कारण आमच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT