लसीकरण 
महाराष्ट्र

दोन डोस घेतलेल्यांनाच "पावणार" देव!

Ashokraje Nimbalkar

अहमदनगर ः कोरोनामुळे लागलेले निर्बंध कधी उठणार याविषयी दररोज चौकाचौकात चर्चा रंगत असते. २५ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत सरकार विचार करीत होते. परंतु नंतर टास्क फोर्सने दिलेल्या अहवालामुळे तो निर्णय मागे घेतला गेला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, असे दिसत असतानाही काही जिल्ह्यांमध्ये रूग्णसंख्या वाढते आहे. नगर जिल्ह्यातील स्थितीही त्यापेक्षा वेगळी नाही.

लसीकरण झालेल्या मुंबईकरांना लोकल प्रवेश दिला जात आहे. मात्र, लसच मिळाली नाही तर ती कशी घेणार, असा सवाल काही प्रवाशांकडून केला जात आहे. सर्व आस्थापना सुरू झाल्या मग मंदिरे कधी करणार असा सवाल विरोधी भाजपच्या नेत्यांकडून सरकारवर केला जात आहे. ज्या लोकांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच देवदर्शन होणार आहे. त्याबाबत सरकार विचार करीत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.त यामुळे लस घेतलेल्यांनाच देव पावणार का, अशीही कुजबूज सुरू झालीय.Citizens who have taken two doses will get access to the temple

ज्या लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्याविषयी सरकार विचार करीत आहे. दोन डोस घेऊन चौदा दिवस झालेल्या लोकांनाच देवदर्शनासाठी पास दिले जातील. सध्या सणावाराचे दिवस आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळे खुली केली जाणार नाहीत, यावर मात्र सरकार ठाम आहे. तसे केल्यास रूग्ण संख्या वाढण्याची शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केलीय. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असेही मंत्री मुश्रीफ सांगायला विसरले नाही.

नगर जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्यानेच रूग्ण जास्तीचे दिसत आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी आहे. राज्य सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. दीपक म्हैसकर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.Citizens who have taken two doses will get access to the temple

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT