citizens removed encroachment from lakshtirth vasahat kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत निरव शांतता, नागरिकांकडून स्वत:हून अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ

लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत प्रार्थना स्थळ आहे अशी तक्रार कोल्हापुर महापालिकेकडे हिंदुत्वावादी संघटनांनी केली हाेती. या विरोधात न्यायालयात देखील हे प्रकरण होते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत (Laxtirth Vasahat Kolhapur) असलेले अनधिकृत प्रार्थना स्थळ हटवावे असा आदेश न्यायालयाने दिला. त्यानूसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या कोल्हापुर महापालिकेच्या अतिक्रमण विराेधी पथकास नागरिकांनी विराेध केला. दरम्यान जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासन आणि नागरिकांत बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आज (गुरुवार) सकाळपासून नागरिकांनी अतिक्रमण हटविण्यास स्वत:हून प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत प्रार्थना स्थळ आहे अशी तक्रार कोल्हापुर महापालिकेकडे हिंदुत्वावादी संघटनांनी केली हाेती. या विरोधात न्यायालयात देखील हे प्रकरण होते. न्यायालयाने हे प्रार्थना स्थळ काढण्याचे आदेश दिले हाेते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस लक्षतीर्थ वसाहत येथे अतिक्रमण विराेधी पथक यंत्रणेसह कारवाईसाठी गेले हाेते.

तेथे स्थानिक नागरिकांनी कारवाई करण्यासाठी पथकास मोठा विरोध केला. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि नागरिकांची बैठक झाली या बैठकीत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आज सकाळी सात वाजल्यापासून प्रार्थना स्थळ स्थानिक नागरिकांनी स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पाेलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केले आहे. या परिसरात शांतता आहे. नागरिकांनी काेणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT