Parbhani Politcial News : अवघ्या एका महिन्यात परभणी जिल्हा नियाेजन समितीवर मुख्यमंत्र्यांच्या गटाची सरशी; जाणून घ्या नवे सदस्य

राज्य मुस्लिम अल्पसख्यांक अध्यक्ष सईद खान यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारस केल्यावर परभणी जिल्हा नियाेजन समितीच्या नव्या निवडी करण्यात आल्या आहेत.
said khan with cm eknath shinde
said khan with cm eknath shindesaam tv
Published On

Parbhani News :

परभणी जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची निवड झाली आहे. यामुळे अवघ्या महिनाभरातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटातील पाच जणांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत. (Maharashtra News)

परभणी जिल्हा नियोजन समितीवर मागील महिन्यात शिवसेनेला अपेक्षित स्थान देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे काही नेते मंडळींनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिवसेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्र शासनाने मंगळवारी (ता. 30 जानेवार) काढले आहे.

said khan with cm eknath shinde
Sillod Bazar Samiti Election Result : सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा, अब्दुल सत्तारांच्या पॅनेलची बाजी

यापूर्वी नियोजन समितीच्या मागील यादीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले होते. परंतु, यात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला डावलण्यात आल्याची भावना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर राज्य मुस्लिम अल्पसख्यांक अध्यक्ष सईद खान यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारस केल्यावर 30 जानेवारीला एका नव्या पत्रकाद्वारे 09 सदस्यांची पुन्हा परभणी जिल्हा नियाेजन समितीच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत.

पाच सदस्य मुख्यमंत्री गटाचे

परभणी जिल्हा नियाेजन समितीवर ज्ञानोबा वाहुळे, प्रविण देशमुख, चक्रधर उगले, सर्जेराव गिराम, माजी खासदार सुरेश जाधव, प्रताप देशमुख, हुसैनी सय्यद इम्रान हुसैनी सय्यद खुदादाद, मिलिंद खिल्लारे, भावना नखाते यांची निवड झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 09 सदस्यांपैकी 05 सदस्य हे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे आहेत.

Edited By : Siddharth Latkar

said khan with cm eknath shinde
Kolhapur News: कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, कलम 144 लागू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com