ghauli, yavatmal, gastro saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे गहूलीत नागरिकांना गॅस्ट्राेची लागण

गावचा मुख्य प्रशासक म्हणून ग्रामसेवक यांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असून ग्रामसेवकच गावात येत नसल्याचे तक्रार गावातील नागरिकांनी केली आहे.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गहूली इथे दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे गावातील अनेक नागरिकांना गॅस्ट्रो व पोटदुखी या सारख्या गंभीर आजाराची लागण झाली आहे. दरम्यान नागरिकांनी उकळूण पाणी प्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Maharashtra News)

संपूर्ण महाराष्ट्राला गहुली या गावची ओळख आहें याच गहुली गावाने महाराष्ट्र राज्याला दोन दोन कर्तबगार मुख्यमंत्री दिले त्याच गहुली गावात आज मात्र नागरी आरोग्याच्या सोई सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत.

गावातील प्रशासन व्यवस्थेचे ढिसाळ व्यवस्थापन असल्या कारणाने गहुली येथे सार्वजनिक पानवट्याची विहीर असून त्या विहिरीच्या अवतीभवती गावातील नाल्यांच्या सांडपाण्याच्या निचरा होत असल्याने तेच घाण पाणी सार्वजनिक विहिरीच्या स्त्रोतांमध्ये विलीन होते व त्याच पाण्याचा पुरवठा गावातील नागरिकांना पाणी पिण्यासाठी होत आहें.

मागील तीन दिवसापासून या विहिरीचे पाणी पीत असल्याने गावातील अनेक महिला व पुरुषांना, गॅस्ट्रो,व पोटदुखी या सारख्या गंभीर आजाराची लागण झाली. गहुली येथे आरोग्य केंद्राची इमारत असतानाही या केंद्रात एकही निवासी डॉक्टर व नर्सेस राहत नसल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले तीन दिवसापासून गॅस्ट्रोची लागण झालेले महिला ज्येष्ठ रुग्ण अत्यावस्थेत आहेत.

आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी व तालुका गटविकास अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी गावात दौरा करून महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. सार्वजनिक विहिरी संदर्भात काही सूचना केल्याने थातूरमातूर कामाची सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक विहिरीच्या पानवट्याजवळ गावातील महिला कपडे धुण्याचे काम करतात तेच पाणी विहिरीमध्ये जात असल्याने विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

गावात आरोग्य केंद्राची निर्मिती असतानाही अत्यावश्यक असलेले रुग्ण व त्यांचा उपचार मात्र ग्रामपंचायत कार्यालयातच सुरू आहे आरोग्य केंद्राचा ढिसाळ व भोंगळ कारभार निदर्शनास आला आहे. गावामधील सांड पाण्याच्या नाल्यामध्ये अनेक घाणीचे साम्राज्य असून कोणत्याही प्रकारची स्वच्छता केल्या जात नाही तसेच सार्वजनिक विहिरीमध्ये नेहमी साफसफाई करून ब्लिचिंग पावडरचा वापर होत नसल्याचे गावातील नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना

SCROLL FOR NEXT