Nagar Aurangabad Highway News : अल्पवयीन मुलीला शाेधा, संशयितांना अटक करा... हिंदुत्ववादी संघटनांसह ठाकरेंच्या सेनेचे नगर औरंगाबाद महामार्गावर आंदाेलन

love jihad : हे प्रकरण लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.
Nagar Aurangabad Highway, love jihad, Police
Nagar Aurangabad Highway, love jihad, Policesaam tv

- सुशील थोरात

Nagar News : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे एका अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याची घटना घडली आहे. संबंधित मुलीचा शाेध घ्यावा तसेच घटनेतील संशयितांना अटक करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी नगर औरंगाबाद महामार्गावर (nagar aurangabad highway) आज रास्ता राेकाे आंदाेलन करण्यास प्रारंभ केला. दरम्यान पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेत लवकरच संशयितांना अटक केली जाईल असे आश्वासित केले. (Maharashtra News)

Nagar Aurangabad Highway, love jihad, Police
Mission Admission : अकरावी प्रवेशासाठी आठ जूनपासून भरावे लागणार पसंतीक्रम; जाणून घ्या वेळापत्रक

संबंधित अल्पवयीन मुलीस 22 मे रोजी दुरगाव या गावातून त्याच गावातील एका तरुणाने पळवून नेले. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी वेळेत तक्रार न घेतल्याने दोन दिवस ती अल्पवयीन मुलगी कर्जत तालुक्यात असूनही आई-वडिलांनी ती परत आणण्यासाठी पोलिसांची मदत मिळाली नाही असा आराेप नातेवाईकांनी केला आहे.

त्यानंतर 25 तारखेला पोलिसांनी या मुलीच्या पळवून जाण्याबाबत तक्रार नोंदवून घेतली. मात्र अजूनही त्या अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण चालू केले आहे. जोपर्यंत मुलगी सापडत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच आहे अशी भूमिका त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.

Nagar Aurangabad Highway, love jihad, Police
Satara Crime News : दारूच्या नशेत तर्रर्र... मुख्यालयातील पाेलिस निरीक्षकाला पब्लिकने बेदम चाेपला, व्हिडिओ व्हायरल झाला ना भाऊ

या प्रकरणात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने लक्ष घातले असून त्या अल्पवयीन मुलीचा तपास लवकरात लवकर लावावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने डी एस पी चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष संभाजी कदम यांनी दिली हाेती. त्यानूसार आज सेनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी आंदाेलन केले.

Nagar Aurangabad Highway, love jihad, Police
SSC Result 2023 : वयाच्या ५४ व्या वर्षी दहावीत मिळविले ५४ टक्के, वाचा भगत आजींची Success Story

पोलिसांनी (nagar) वेळेत दखल न घेतल्याचा आरोप करत मुलीच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे. या कुटुंबाची आज आमदार राम शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीत आमदार राम शिंदे यांच्याकडून कुटुंबियांची मनधरणी करण्यात आली. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली गेली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com