Hatur Toll Naka : कांदा उत्पादक शेतक-यांनी राेखला धुळे - सोलापूर महामार्ग, हातनूर टोल नाक्यावर ठिय्या; येवल्यात 'प्रहार' चे आंदाेलन

कांद्याच्या माळा गळ्यात घालत शेतक-यांनी आंदोलन छेडले.
Rasta Roko Aandolan, Farmers, Hatnur Toll Naka
Rasta Roko Aandolan, Farmers, Hatnur Toll Naka saam tv
Published On

- डाॅ. माधव सावरगावे / अजय सोनवणे

chhatrapati sambhaji nagar news : कांद्याच्या भावासाठी (onion pirce) शेतकरी रस्त्यावर उतरलेत. शेतक-यांनी कन्नड तालुक्यातील हातनूर टोल नाका जवळील धुळे-सोलापूर महामार्ग (dhule solapur highway) अडवला. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. सुमारे तासभर शेतकरी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बसून हाेते. घटनास्थळी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.  (Maharashtra News)

Rasta Roko Aandolan, Farmers, Hatnur Toll Naka
Mission Admission : अकरावी प्रवेशासाठी आठ जूनपासून भरावे लागणार पसंतीक्रम; जाणून घ्या वेळापत्रक

येवला प्रांत कार्यालयात आंदाेलन

गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने प्रहार शेतकरी संघटना येवल्यात (yeola) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. थेट प्रांत कार्यालयावर धडक देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने येवला प्रांत कार्यालय आवारात कांद्याच्या माळा गळ्यात घालत मुंडन आंदोलन करण्यात आले.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव, निर्यात होणाऱ्या कांद्याला अनुदान, खताच्या किमती कमी करण्याची मागणी यासह विविध मागण्या करण्यात आल्या,सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजार भावाचे आणि सरकारचा यावेळी निषेध करत हे मुंडन आंदोलन करण्यात आले.

नाफेड करणार कांदा खरेदी

दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. नाफेडकडून (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.) नाशिक (nashik) जिल्ह्यात कांदा खरेदी (purchasing of onion) सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा खरेदीसाठी नाफेडकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com