citizens andolan at lonar dhareshwar temple, buldhana news  saam tv
महाराष्ट्र

Lonar Dhareshwar Temple : गायमुख कुंड भाविकांसाठी खूला करा : लाेणारवासिय आक्रमक (पाहा व्हिडिओ)

या आंदोलनात महिलांची संख्या देखील लक्षणीय राहिली.

संजय जाधव

Buldhana News : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील एकमेव भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धार तीर्थ येथे प्राचीन काळापासून या धारेखाली भाविक स्नान करीत असतात. या स्नास पुरातत्व खात्याने मनाई केली आहे. या आदेशाच्या विराेधात आज (शनिवार) लोणारवासियांनी आंदाेलन छेडले आहे. (Maharashtra News)

लोणार सरोवर परिसरात असलेल्या पुरातन वास्तू व मंदिरे हे केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. या परिसरातील धारेश्वर मंदिराच्या परिसरात एक गोमुख असून त्यातून वर्षभर पाणी पडत असते. त्यामुळे भाविक याठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येत असतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या शेकडो वर्षांची ही परंपरा होती. कोरोना काळात या धारेश्र्वर स्नान पुरातत्व विभागाने बंद केले. याठिकाणी पर्यटकांना व भाविकांना जाण्यास बंदी केली आहे. त्यामुळे भाविकांना या तीर्थक्षेत्राचा पवित्र स्नान करता येत नाही.

ही बंदी उठवावी यासाठी अनेकदा (buldhana) नागरिकांनी, संघटनांनी निवेदन दिले. वेळप्रसंगी आंदोलन छेडले. मात्र पुरातत्व विभागाने स्नानासाठीची बंदी उठवली नाही. आता आज (शनिवार) भाविक आणि अनेक सामाजिक संघटना, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून व काही हिंदुत्ववादी संघटनांकडून पुरातत्व विभागाकडून घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी या मागणीसाठी तीर्थस्थळी स्नान करुन आंदोलन छेडले. या आंदोलनात महिलांची संख्या देखील लक्षणीय राहिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Benefits: रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने काय बदल होतात?

अरफीन खानचा 'Bigg Boss' च्या घराला बाय-बाय! पत्नी सारा ढसा ढसा रडली, म्हणाली...

Maharashtra News Live Updates: भाजप उमेदवार संतोष दानवे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट

Tea-Biscuit : सतत चहा-बिस्किट खाऊन एसिडीटी होतेय? 'ही' गंभीर समस्या असू शकते, वेळीच करा हे उपाय

Amravati News : अमरावतीची जागा कमी झाली तरी चालेल; आमदार रवी राणांचा संजय खोडके यांना खोचक टोला

SCROLL FOR NEXT