Cidco lottery 2022  saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai News : घर घेऊ इच्छुकांसाठी आनंदाची बातमी; सिडकोकडून 'इतक्या' घरांसाठी लॉटरी जाहीर

मुंबईत घर घेणं आता सामन्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे. त्यामुळे मुंबईकर आता नवी मुंबई, बदलापूर, कर्जत , कसारा, वसई-विरार या भागात घरे विकत घेण्याचा कल वाढला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

CIDCO Lottery 2022 : मुंबईत घर घेणं आता सामन्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे. त्यामुळे मुंबईकर आता नवी मुंबई, बदलापूर, कर्जत , कसारा, वसई-विरार या भागात घरे विकत घेण्याचा कल वाढला आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) किंवा पनवेल परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोने यंदाच्या वर्षी मेगालॉटरी काढण्याचा विचार केला आहे. गणेशोस्तवाच्या मुहूर्तावर सिडकोने मेगालॉटरीचा निर्णय घेतला आहे.

सिडकोकडून जाहीर करण्यात येणाऱ्या मेगालॉटरीमध्ये सदनिका तसेच व्यावसायिक गाळे, भूखंडची मेगा लॉटरी असणार आहे. सिडको उद्या (31 ऑगस्ट ) रोजी सदर ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. घर घेऊ इच्छित ग्राहकांना गुरूवारपासून अर्ज करता येणार आहे. गणेशोस्तवाच्या मुहूर्तावर ४१५८ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तसेच २४५ दुकाने आणि सहा व्यावसायिक भूखंडासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

दरम्यान, म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेत आता बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे सोडतीची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्यांना अर्ज भरताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे ही ऑनलाईन जमा करावी लागणार आहे. तसेच कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच सोडतीत समाविष्ट होऊ शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT