Jalna News saam tv
महाराष्ट्र

Jalna News: भाजप आमदाराच्या वक्तव्याने नवा वाद; ख्रिस्ती समाजाने निषेध करत केले जोडे मारो आंदोलन

जालन्यात ख्रिस्ती समाजाने आमदार राम सातपुते यांच्या विरोधात पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : भाजप आमदार राम सातपुते यांच्या ख्रिस्ती समाजावरील वक्तव्याने नवा सुरू झाला आहे. राम सातपुते यांच्या वक्तव्यानंतर ख्रिस्ती समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जालन्यात ख्रिस्ती समाजाने आमदार राम सातपुते यांच्या विरोधात पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

नागपुरात (Nagpur) हिवाळी अधिवेशन सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी ख्रिस्ती समाजाकडून पैसे देऊन धर्मांतर केल्याचा खोटा आरोप केला होता. राम सातपुते यांच्या वक्तव्यानंतर ख्रिस्ती समाजाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

'ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस सुरू असताना समाजाची हेतुपुरस्कर बदनामी करण्याच्या हेतूने चुकीचे विधान करून समाज आणि समाजात तेढ निर्माण होऊन द्वेष निर्माण होईल असं कृत्य केल्याने त्यांच्या विरुद्ध खोटी अफवा पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

जालन्यात ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमदार राम सातपुते त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी ख्रिस्ती समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

राम सातपुते काय म्हणाले होते?

राम सातपुते हिवाळी अधिवेशनात म्हणाले होते, 'नगरच्या ब्राह्मणी गावात कमल सिंग नामक ख्रिश्चन मिशनरी ने PI दराडेच्या मदतीने धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत आहे. या समाजकंटकांनी आपल्या हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना केलीच, सोबतच महिला भगिनींचा विनयभंग केला.

'आज या प्रकरणाचा विधानसभेत पर्दाफाश केला व या मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या #PI दराडे ला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात धर्मांतर विरोध कायदा आणणार का, असा प्रश्न राम सातपुते यांनी उपस्थित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: BMC ची वनक्षेत्र आणि संरक्षित झोपडपट्टी परिसरात टॉवर उभारण्यास परवानगी

Pune : "तुम्हाला घरपोच दारू मिळेल" होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा

EPFO Alert : नोकरदारांनो लक्ष द्या! ऑक्टोबरचा PF जमा करण्याची शेवटची तारीख ठरली! लगेच जाणून घ्या

Pen Fort : इतिहासप्रेमी अन् ट्रेकर्ससाठी पर्वणी! पेणजवळील 'या' ५ किल्ल्यांची सफर तुम्हाला नक्की आवडेल

Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

SCROLL FOR NEXT