Chipi Airport Sindhudurg: लोकार्पणावरून भाजपची पोस्टरबाजी अनंत पाताडे
महाराष्ट्र

Chipi Airport Sindhudurg: लोकार्पणावरून भाजपची पोस्टरबाजी

या ठिकाणी फक्त भाजपच शक्ति प्रदर्शन करू शकत. अशा पद्धतीने विशाल परब यांनी असा टोला शिवसेनेला लावला

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाकरिता शेवटी मुहूर्त सापडला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. चिपी विमानतळ प्रवासी विमान उड्डाणास आता सज्ज झाला आहे. अलाएन्स एअर या विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीनं देखील ७ ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी शिवसेनेने शक्ति प्रदर्शनाची भाषा करू नयेत. या ठिकाणी फक्त भाजपच शक्ति प्रदर्शन करू शकत. अशा पद्धतीने विशाल परब यांनी असा टोला शिवसेनेला लावला आहे. नारायण राणे हेच चिपी विमानतळाचे शिल्पकार आहेत.

९ ऑक्टोबरला उदघाटनादिवशी नारायण राणे आणि हवाई उड्डाण मंत्री जोतिरादित्य शिदींया यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रीया भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिला आहे. जन आशीर्वाद यात्रे प्रमाणेच चिपी विमानतळच्या उद्घाटनाचे नारायण राणे यांचे स्वागताचे भव्य दिव्य होल्डिंग विशाल परब यांनी उभारून भाजपच्या वतीने जोरदार शक्ति प्रदर्शन केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यातच झाडे का कोसळतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Smart Meter: स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढलं? महावितरणने सांगितलं खरं कारण

Monsoon Tips: पावसाळ्यात तुमच्याही बुटांना घाणेरडा वास येतोय का? 'या' ट्रिक्स नक्की फॉलो करा

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील पोलीस मुख्यालयात पाणी भरलं

EPFO Big Update: EPFOचा मोठा खुलासा! 31 लाख PF खात्यांमध्ये अडकले 9,330 कोटी

SCROLL FOR NEXT