पावसाळ्यातच झाडे का कोसळतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Manasvi Choudhary

झाडे कोसळण्याच्या घटना

मुसळधार पावसात मुंबईसह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी झाडे कोसळणाच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी झाडे कोसळून जिवितहानी, वित्तहानी देखील होते.

Monsoon Tree Fall Reason

झाडे कोसळण्याची कारणे?

मात्र तुम्हाला माहितीये का? पावसाळ्यातच झाडे का कोसळतात? झाडे कोसळण्याची नेमकी कारणे काय आहेत.

Monsoon Tree Fall Reason

मातीचा सैलपणा

पावसाळ्यात सततच्या पावसामुळे जमीन पूर्णपणे ओली होते. जमिनीतील मातीचा घट्टपणा कमी होऊन ती भुसभुशीत किंवा चिखलमय बनते. झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात, पण जेव्हा माती खूप जास्त ओली होते, तेव्हा मुळांना पुरेसा आधार देऊ शकत नाही, ज्यामुळे झाड मुळासकट कोसळतात.

Soil Saturation

मुळे सडणे

अनेकदा झाडांच्या मुळांना बुरशी किंवा इतर आजार झालेली असतात, जे वरून पटकन लक्षात येत नाहीत. पावसाळ्यात मुळांच्या सभोवताली पाणी साचून राहिल्याने मुळे कुजतात यामुळे झाड आतून कमकुवत होते आणि वाऱ्यानेही कोसळते.

Root Rot

अयोग्य छाटणी

पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची योग्य छाटणी न केल्यास, झाडाचा वरचा भार वाढतो आणि झाड कोसळते.

Monsoon Tree Fall Reason

झाडांचा प्रकार आणि वय

काही झाडांची मुळे जमिनीच्या वरच्या थरातच पसरलेली असतात अशी झाडे पावसाळ्यात लवकर कोसळतात. तसेच, खूप जुनी झालेली झाडे ज्यांच्या खोडात पोकळी निर्माण झाली आहे, ती झाडेही पावसाळ्यात जोरदार वेगात कोसळतात.

Monsoon Tree Fall Reason

वाऱ्याचा वेग

पावसाळ्यासोबत वाऱ्याच्या वेगात मुळे जमिनीला घट्ट पकडू शकत नसल्यामुळे, वाऱ्याच्या दबावाखाली झाडे कोसळतात.

Wind Resistance

NEXT: स्वप्नात पाऊस दिसणं शुभ की संकटाची चाहूल?

Rain Astrology Prediction
येथे क्लिक करा...