EPFO Big Update: EPFOचा मोठा खुलासा! 31 लाख PF खात्यांमध्ये अडकले 9,330 कोटी

EPF Scheme 2026 : आयटीआयमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातल्या ३०.९१ लाख निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये ९.३३० कोटी रुपये अडकले आहेत. EPF Scheme 2026 लागू झाल्यानंतरही अनेकांनी अद्याप दावा केलेला नाही.
EPF Scheme 2026
EPF Scheme 2026google
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. RTI ने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत देशात ३०.९१ लाख निष्क्रिय पीएफ खाती असून त्यामध्ये तब्बल ९,३३० कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम अडकून पडली आहे.

जेव्हा केंद्र सरकारने EPF Scheme २०२६ लागू केली तेव्हा ही माहिती समोर आली आहे. २९ जून २०२६ पासून ही नवीन योजना लागू झाली आहे. याआधीची १९५३ मधील EPF योजना तिच्या जागी आली आहे. नव्या योजनेचा उद्देश EPF नियम जास्त सोपं करणं आणि सेवा डिजिटल बनवणे हा आहे.

EPF Scheme 2026
ITR Refund: ITR Refund अडकला? ई-व्हेरिफिकेशन उशिरा झाले तरी मिळणार परतावा; ITAT चा मोठा निर्णय

RTI मधील आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ रोजी ३१.८३ लाख निष्क्रिय खाती होती. एका वर्षात हा आकडा ९२ हजारांनी कमी होऊन ३०.९१ लाखांवर आली आहे. तसेच दावा न केलेल्या रकमेतही ८५१ कोटी रुपयांची घट झालेली आहे. ही घट १०,१८१ कोटी रुपयांवरून ९३३० कोटी रुपयांवर आलेली आहे.

अहवालानुसार, ही रक्कम इतकी मोठी आहे की सध्याच्या अंदाजानुसार त्यातून देशात तीन नवीन IIT उभारता येऊ शकतात. पण RTI मध्ये आधारशी जोडलेल्या निष्क्रिय खात्यांचा तपशील, हा ५ लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती आणि ऑटो-सेटलमेंटचा डेटा EPFO ने गोपनीयतेच्या कारणास्तव देण्यास नकार दिला आहे.

EPF Scheme 2026
Budget Honeymoon : खिशात जास्त पैसे नाहीत? स्वस्त आणि मस्त 'या' ७ जागांवर प्लॅन करा ड्रीम हनिमून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com