Shruti Vilas Kadam
बुटांना घाणेरडा वास
पावसाळ्यात हवेत दमटपणा वाढलेला असतो. पावसात बुटांमध्ये पाणी जाते आणि पायाला आलेला घाम यामुळे बुटांमध्ये बॅक्टेरिया तयार होतो. याच बॅक्टेरियांमुळे बुटांना घाणेरडा वास येतो. काही सोप्या टिप्सने या समस्येपासून सुटका मिळवू शकते.
लिंबूवर्गीय फळांच्या सालीमध्ये नैसर्गिक सुगंधी तेल आणि अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. रात्रभर सुकलेल्या साली शूजच्या आत ठेवून द्या. शूजमधील दुर्गंधी शोषून घेतली जाईल.
ओले बूट कोरडे करण्यासाठी बुटामध्ये पेपर किंवा टिशू पेपर घट्ट भरून ठेवा. ते बुटातील अतिरिक्त ओलावा शोषून घेतात.
व्हिनेगरमध्ये असणारे ॲसिड दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करते. एका स्प्रे बॉटलमध्ये समप्रमाणात पांढरे व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. शूजच्या आत या मिश्रणाचा हलका स्प्रे करा आणि शूज सुकू द्या.
बुटांची दुर्गंधी दूर करण्यासाठी बुटांमध्ये थोडा बेकिंग सोडा (खाण्याचा सोडा) टाका. घालताना बूट उलटे करून सोडा झटकून घ्या.
कडुनिंबाची सुकलेली पाने शूजच्या आत पसरवून ठेवा. ही पाने शूजमधील बॅक्टेरिया आणि बुरशी पूर्णपणे नष्ट करतात. विशेषतः पावसाळ्यात पाय इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी आणि बुटांचा सडलेला वास घालवण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय आहे.
लवंग आणि कापराच्या वड्या सुती कापडात किंवा टिश्यू पेपरमध्ये बांधून त्याची छोटी पोटली शूजमध्ये ठेवा. कापूर शूजमधील ओलसरपणा शोषून घेईल आणि लवंग बॅक्टेरिया वाढू देणार नाही.
दुर्गंधी कमी करण्यासाठी रबिंग अल्कोहोल किंवा पांढरा व्हिनेगर पाण्यात मिसळून बुटांच्या आतल्या भागात हलका स्प्रे करा.