Shruti Vilas Kadam
स्मार्ट मीटर हा डिजिटल वीजमीटर असून तो वीज वापराची माहिती थेट वीज वितरण कंपनीकडे पाठवतो. त्यामुळे मीटर रीडिंगसाठी कर्मचाऱ्यांची गरज राहत नाही.
अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
महावितरणच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत नाही. मीटर केवळ प्रत्यक्ष वीज वापराची अचूक नोंद करतो. जुन्या मीटरमध्ये नोंद न होणारा वीज वापरही आता नोंदवला जात असल्याने बिल वाढल्यासारखे वाटते.
वाढलेला वीज वापर, पूर्वी चुकीचे किंवा अंदाजे मीटर रीडिंग, AC पंखा टिव्हीचा वापर वाढणे यामुळे बिल जास्त येऊ शकते.
स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर नियमित लक्ष ठेवता येते. त्यामुळे अनावश्यक वीज वापर कमी करण्यास मदत होते.
स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंगमधील चुका कमी होतात. तसेच बिलिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होण्यास मदत होते.
स्मार्ट मीटरमुळे बिलात विसंगती वाटत असल्यास ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात किंवा अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेकडे संपर्क साधून मीटरची तपासणी करण्याची मागणी करावी. महावितरणच्या १९१२, १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी.