Pune News: चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत. आज सकाळपासूनच शरद पवार चिंचवड विधानसभा क्षेत्रात काही ठिकाणी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठका घेत आहेत. या बैठकीत स्वतः शरद पवार कार्यकर्त्यांना आगामी मतदानाविषयी मार्गदर्शन करत आहेत. (Latest Sharad Pawar News)
पुण्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारात महाविकास आघाडीसाठी शरद पवार आणि भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानत उतरले आहेत. मतदानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आज पवारांनी भाजपवर चांगलाच निशाना साधला आहे. सत्ता केंद्रित असते तेव्हा त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, असा टोला पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
सत्तेचे काही गुण आणि काही दोष आहेत.
पुढे शरद पवार म्हणाले की, " लोकशाहीत सत्ता येत जात असते. त्याची काळजी नसावी मात्र सत्ता ही केंद्रित नसावी. सत्तेचे काही गुण आणि काही दोष आहेत. सत्ता जेव्हा विकेंद्रीत असते तेव्हा ती लोकांसाठी फायद्याची असते आणि जेव्हा सत्ता केंद्रित असते तेव्हा त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपला कोपरखळ्या दिल्या आहेत.
'पिंपरी-चिंचवड पूर्वीसारखं राहिलं नाही. पिंपरी चिंचवडचे शहराचे दोन भाग झालेत. एक नदीच्या अलीकडे आणि दुसरा भाग नदीच्या पलीकडे. हे दोन भाग कुणी केले हे मला माहित नाही. विधानसभेच्या पोट निवडणूककीत सहसा मी जात नसतो. मात्र ही निवडणूक पिंपरी चिंचवडची आहे आणि पिंपरी चिंचवडसोबत माझं जुनं नातं आहे त्यामुळे मला यावं लागलं, असं शरद पवारांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.