Ajit Pawar News: भावी मुख्यमंत्री असणार का? बॅनर बाजीवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले; 'उद्या पंतप्रधान...'

NCP: अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे
Ajit Pawar
Ajit Pawar saam tv
Published On

गोपाल मोटघरे

Pune News: राष्ट्रवादीचे दबंग नेते अजित पवार यांचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत. "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा.. अशा आशयाचा मजकूर या बॅनवरवर दिसून येत आहे.

याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही घराबाहेर भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले होते. या बॅनरबाजीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. (Pune News)

Ajit Pawar
Sanjay Raut: खासदार श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ल्याची सुपारी दिली; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

काय म्हणाले अजित पवार?

"राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल अजिबात चुरस नाही. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया बाहेर जर अशा होर्डिंग जर लागले असतील तर तुम्ही ते जास्त मनावर घेऊ नका. जोपर्यंत तुम्हाला 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत अशा होर्डिंगला काही अर्थ राहत नाही," असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.

तसेच "कार्यकर्ते आपल्या वैयक्तिक समाधानासाठी अशा कोटी लावत असतात. मात्र त्यातून काही होत नाही. उद्या भावी मुख्यमंत्री भावी पंतप्रधान असे होर्डिंग लागतील मात्र लोकशाहीमध्ये राज्यांत सत्ता स्थापन करण्यासाठी 145 ह्या मॅजिक फिगरला जास्त महत्त्व आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

Ajit Pawar
Kalyan News: जळगाव कोर्टातील थरारनाट्यातील फरार साथीदार ताब्‍यात; कल्याणमध्ये पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमध्ये अटक

कोश्यारींवरही केला हल्लाबोल..

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे, ज्यामध्ये त्यांनी ठतीन वर्षांपूर्वीची पहाटेच्या शपथविधीची घटना घडली ते तुम्ही 1000 दिवसानंतर का उकरून काढता?ठ अशा शब्दात त्यांनी कोश्यारींवर टीका केली आहे.

तसेच "उद्धव ठाकरे यांना काही जणांनी ट्रॅप मध्ये अडकवलं असा दावा माजी राज्यपाल भगतसिंग कुशारे यांनी केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शंकेला वाव ठेवण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना कुणी ट्रकमध्ये अडकवलं होतं हे राज्यपालांनी स्पष्ट करावे," असे आव्हान देखील अजित पवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com