Nagpur Bench of Bombay High Court delivers a key ruling on adult children’s rights. Saam TV Marathi
महाराष्ट्र

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Bombay High Court ruling on adult daughter custody rights : प्रौढ मुलगी स्वतःच्या इच्छेने आईपासून दूर जाऊन तरुणासोबत राहत असल्यास पालक तिला जबरदस्तीने स्वतःजवळ ठेवू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

Namdeo Kumbhar

Bombay High Court, Nagpur Bench : मुलं ही पालकांची कोणतीही खासगी मालमत्ता नाहीत. त्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार पालकांना नाही, असा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका आईने स्वतःच्या प्रौढ मुलीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. नागपूर खंडपिठाने ही याचिका फेटाळताना स्पष्ट मत व्यक्त केले.

नेमके प्रकरण काय?

उपराजधानी नागपुरातील एक मुलगी १७ वर्षांची असताना शिक्षणासाठी घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर एका तरुणासोबत निघून गेली होती. पोलिसांनी शोध घेऊन मुलीला आईच्या ताब्यात दिले होते. मात्र, मुलगी १८ वर्षांची (प्रौढ) झाल्यानंतर पुन्हा स्वतःच्या इच्छेने घर सोडून त्या तरुणासोबत निघून गेली. यानंतर मुलीचा ताबा मिळवण्यासाठी आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाचे निरीक्षण काय? काय दिला निकाल?

या प्रकरणाची दखल कोर्टाने घेत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुलीशी प्रत्यक्ष संवाद साधला. तेव्हा तिने आपण स्वतःच्या इच्छेने आईची साथ सोडून तरुणासोबत गेल्याचे आणि त्याच्याच सोबत राहण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. त्यावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला.

मुलगी आता वयाने प्रौढ झाली असून तिला स्वतःच्या मर्जीने जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. मुलांच्या ताब्याच्या प्रकरणात पालकांच्या अधिकारांपेक्षा मुलांचे स्वतःचे कल्याण आणि इच्छा सर्वोच्च मानली जाते. मुलीने स्वतःच्या मर्जीने तरुणासोबत जाणे निवडले असल्याने तिचा कोणताही बेकायदेशीर ताबा सिद्ध होत नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. नागपूर न्यायालयाने आईचा दावा फेटाळून लावत, मुलीला तिच्या मर्जीनुसार जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मान्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

Trekking Forts : लोहगड-कलावंतीण दुर्गच नव्हे, महाराष्ट्रातील 'हे' ५ किल्लेही देतात भन्नाट ट्रेकिंग अनुभव

Maharashtra News Live Update: ठाण्यात मध्यरात्री जीवघेण्या स्टंटचा थरार!

Back Pain: रोज पाठ दुखते, बाम लावून दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या 'ही' ७ कारणं असू शकतात जबाबदार

Tuesday Horoscope: आज या राशींच्या आयुष्यात घडणार महत्त्वाचे बदल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT