Shruti Vilas Kadam
बराच वेळ चुकीच्या पद्धतीने बसणे, वाकून काम करणे किंवा संगणकासमोर चुकीच्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो.
दिवसभर सतत बसून राहिल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. याचा परिणाम पाठीच्या स्नायूंवर होऊन कंबर आणि पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो.
जड वस्तू उचलणे, अचानक वाकणे किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. त्यामुळे अचानक किंवा सतत वेदना होऊ शकतात.
अयोग्य गादी किंवा उशीचा वापर केल्याने झोपताना पाठीच्या कण्यावर ताण येऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पाठदुखी जाणवण्याची शक्यता असते.
शरीराचे वजन वाढल्यास पाठीच्या कण्यावर आणि आसपासच्या स्नायूंवर अतिरिक्त भार पडू शकतो. त्यामुळे विशेषतः कंबरेच्या भागात वेदना जाणवू शकतात.
नियमित शारीरिक हालचाल न केल्यास पाठीचे आणि पोटाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे शरीराला योग्य आधार मिळणे कठीण होऊन पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
सतत किंवा तीव्र पाठदुखीमागे डिस्कशी संबंधित समस्या, संधिवात किंवा इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. वेदना दीर्घकाळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.