Shruti Vilas Kadam
बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
ताज्या बीटरूटचा रस काढून त्यात Aloe Vera Gel (कोरफडीचा गर) आणि ग्लिसरिनचे काही थेंब मिसळा
बीटरूटपासून तयार केलेले मिश्रण त्वचेला मॉइश्चर देण्यास आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसण्यास मदत करू शकते.
बीटरूटच्या मिश्रणात मॉइश्चरायझिंग घटक मिसळल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.
चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा केल्यानंतर तयार केलेली नाईट क्रीम हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावी.
घरगुती उपायांचा परिणाम प्रत्येकाच्या त्वचेप्रमाणे वेगळा असू शकतो. त्यामुळे सातत्याने त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोणतेही घरगुती मिश्रण थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य ठरते.