Shreya Maskar
कोथळीगडला पेठ किल्ला असेही म्हणतात. कर्जतजवळील एक वैशिष्ट्यपूर्ण शिखर, जिथे सुळक्याच्या टोकापर्यंत जाण्यासाठी खडकात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे.
लोणावळा/तेल-बैला परिसरातील घनगड किल्ला एका कड्यावर वसलेला आहे. येथे दाट जंगलातील वाटा आणि शिडी किंवा खडकावरून ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो.
कर्जतजवळील एक छोटी आणि फारशी परिचित नसलेला सोंडाई किल्ला ट्रेकिंगसाठी भन्नाट ऑप्शन आहे. येथून 'मोरबे धरण'चे विहंगम दृश्य पाहता येते.
गोरखगड किल्ला हा मुरबाडजवळील एक साहसी ऐतिहासिक ठिकाण आहे. खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि अरुंद कडांचा मार्ग आहे.
पाली परिसरातील सुधागड किल्ला हा एक विशाल ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. येथे भव्य प्रवेशद्वारे, मंदिरे आणि गडाच्या माथ्यावर एक मोठा, लपलेला पठारी भाग आहे.
टकमक किल्ला हा वसई/विरार परिसरातील हा एक खडकाळ ऐतिहासिक किल्ला आहे. एकांत आणि खोल दऱ्यांची दृश्ये पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतरांगेत दुर्ग भंडार किल्ला वसलेला आहे. येथे डोंगराच्या अरुंद कडांवरून चालताना खडकात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग लागतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.