Satara Fort : दोन शिखरे, घनदाट जंगल; 'या' किल्ल्यावर पाहता येईल इतिहास अन् निसर्गाचा अद्भुत संगम

Shreya Maskar

सातारा

सातारा जिल्ह्यात जावळीच्या घनदाट जंगलात सुमारे ४,०५४ फूट उंचीवर मकरंदगड किल्ला वसलेला आहे. हा एक डोंगरावरील किल्ला आहे.

Satara | google

मकरंदगड किल्ला

जावळीचा प्रदेश जिंकताना १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मकरंदगड किल्ल्याचा विकास किंवा पुनर्बांधणी केली.

Makarandgarh Fort | google

वास्तुकला

मकरंदगड किल्ल्याला दोन शिखरे आहेत. मधुशिखर (पश्चिम शिखर- 'मधुगड') आणि मकरंदगड (पूर्व शिखर) त्यांना जोडणारी एक धार (कटक) आहे.

Architecture | google

किल्ल्यावर कोणाचा ताबा?

विविध कालखंडांत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. किल्ल्याला नक्की भेट द्या.

Who owns the fort? | google

महत्त्व

मकरंदगड किल्ल्याने जावळीच्या घनदाट जंगलात प्रतापगड आणि वासोटा किल्ला यांच्यातील धोरणात्मक संदेशवहन आणि सामरिक दुवा म्हणून त्याने काम केले.

Importance | google

किल्ल्याचा आकार

मकरंदगड किल्ला ज्याला अनेकदा मधु मकरंदगड असेही बोले जाते. तुम्ही जर पहिल्यांदा ट्रेकिंगचा अनुभव घेत असाल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.

The size of the fort | google

कसं जावे?

मुंबई ते साताऱ्यापर्यंत ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर मकरंदगड किल्ल्यावर जाण्यासाठी घोणसपूर आणि हातलोट ही दोन पायथ्याची गावे आहेत. स्टेशनपासून या गावांपर्यंत रिक्षाने प्रवास करा.

How to go? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Maharashtra Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...