Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Shreya Maskar

पावसाळा

रिमझिम पावसात ट्रेकिंगचा मजा येते. कलावंतीण दुर्ग हा ट्रेकिंगसाठी थरारक मानला जातो. तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला देखील ट्रेकिंगसाठी धोकादायक मानला जातो.

rainy season | google

नाशिक

नाशिक जिल्ह्यात असलेला साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे आणि त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १,५६७ मीटर (५,१४१ फूट) इतकी आहे.

Nashik | google

महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला!

साल्हेर किल्ला १६७२ मध्ये मराठ्यांनी मुघलांचा खुल्या मैदानात पराभव करून मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापतींच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने मुघल सैन्याचा पराभव केला होता.

The highest fort in Maharashtra! | google

आव्हानात्मक ट्रेक

आव्हानात्मक वाटा, खडकात कोरलेली पाण्याची टाके, प्राचीन गुहा आणि सह्याद्री पर्वतरांगेची विहंगम दृश्ये यामुळे हा किल्ला साहसी पर्यटकांना आकर्षित करतो.

A challenging trek | google

आजूबाजूचा परिसर

किल्ल्याच्या शिखरावर भगवान परशुराम यांचे प्राचीन मंदिर आहे. परशुराम हे सांस्कृतिकदृष्ट्या तपश्चर्येशी जोडलेले मानले जातात.

nature | google

किल्ल्याची रचना

साल्हेर किल्ल्याचा विस्तार लांबट कड्यांच्या स्वरूपात आहे आणि त्याला अवाढव्य असे उभे कडे आहेत. हा किल्ला ज्या अद्वितीय ज्वालामुखीजन्य बेसाल्ट पर्वतीय भूभागावर वसलेला आहे, त्यावरूनच त्याचा हा आकार निश्चित झाला आहे.

Fort structure | google

कसं जाल?

मुंबईहून नाशिकपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे नाशिक स्टेशनला उतरल्यावर रिक्षा किंवा बसणे तुम्ही साल्हेर किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. पावसाळ्यात येथे ट्रेक प्लान करा.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : १ चुकीचं पाऊल अन् थेट २,२५० फूट खोल दरीत, सूर्य मावळल्यानंतर 'या' किल्ल्याजवळ कुणी फिरकत नाही

Dangerous Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...