Dangerous Fort : १ चुकीचं पाऊल अन् थेट २,२५० फूट खोल दरीत, सूर्य मावळल्यानंतर 'या' किल्ल्याजवळ कुणी फिरकत नाही

Shreya Maskar

खतरनाक किल्ला

कलावंतीण दुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटात, पनवेलजवळ स्थित २,२५० फूट (६८६ मीटर) उंचीचा एक प्रसिद्ध सुळका आणि ऐतिहासिक किल्ला आहे.

Dangerous castle | google

कलावंतीण दुर्ग

हा ट्रेक ठाकूरवाडी या पायथ्याच्या गावापासून सुरू होतो आणि 'प्रबळमची' नावाच्या पठारावरून पुढे जातो. हिवाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Kalawantin Durg | google

ट्रेकचा अनुभव

ट्रेकिंगच्या शेवटच्या टप्प्यात सुळक्याच्या उभ्या कडेवरून वळणावळणाने जाणारे, खडकात कोरलेले अरुंद आणि अतिशय तीव्र उताराचे जिने आहेत. या जिन्यांच्या बाजूला खोल दरी आहे. येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.

Experience the trek | google

निसर्ग सौंदर्य

येथून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे, तसेच शेजारील प्रबळगड किल्ला आणि माथेरानचे विहंगम दृश्य दिसते. पावसाळ्यात येथील सौंदर्य अजूनच चित्तथरारक वाटते.

Beauty of nature | google

थरार ट्रेक

कलावंतीण दुर्ग हा ट्रेक भीतीदायक आणि धोकादायक मानला जातो कारण या मार्गावर ६० अंशांचा तीव्र उतार असलेल्या खडकातील पायऱ्या आहेत, ज्या अरुंद आहेत, त्यांना आधार देण्यासाठी रेलिंग्ज नाहीत आणि सर्व बाजूंना खोल दरी आहे.

Thrill Trek | google

पावसाळा

पावसाळ्यात खडकातील या उघड्या पायऱ्या ओल्या आणि निसरड्या होतात, तसेच तिथे सैल खडक किंवा माती असू शकते. वर चढण्यापेक्षा खाली उतरणे अनेकदा अधिक कठीण आणि भीतीदायक वाटते, कारण खाली उतरताना तुम्हाला समोरची प्रचंड खोल दरी थेट दिसते.

rainy season | google

मुंबई

कलावंतीण दुर्ग हा मुंबईजवळील खतरनाक ट्रेकिंग स्पॉट आहे. वीकेंडला येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Mumbai | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : रहस्यमय घटना अन् भयानक आवाज, 'या' किल्ल्यावर दिवसा देखील जाण्यास घाबरतात लोक

Haunted Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...