महाराष्ट्र

Boiling Milk Accident: खेळता खेळता चिमुकला उकळत्या दुधात पडला; आई-वडिलांसमोरच मुलाचा तडफडून मृत्यू

Child Falling Into Boiling Milk: एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा दुधाच्या कढईत पडून मृत्यू झाला आहे.

Ruchika Jadhav

Chhatrapati Sambhajinagar:

आज कृष्णजन्माष्टमी संपूर्ण देशात आनंदाने साजरी केली जात आहे. अशात सणाच्या दिवशीच पैठणमधून एक दु:खद घटना समोर आलीये. एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा दुधाच्या कढईत पडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जातेय. (Latets Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. नेहरु चौक परिसरातील सजंरपुरा येथील अब्बु शमी कट्यारे यांच्या घरी मालेगाव येथील विवाहीत मुलगी माहेरी आली होती.

२८ ऑगस्ट रोजी मोहम्मद जियान मोहम्मद इरफान हा घरात खेळताना गरम दुधाच्या कढाईत पडल्याने मोठ्या प्रमाणावर भाजला होता. छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान आज सकाळी पहाटे त्याचा मृत्यू झाला. पैठण पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या आधी देखील बुलढाण्यात अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी या घटनेत ६ वर्षीय मुलगी दगावली. तिच्या वडिलांचा मिठाईचा व्यवसाय होता. त्यासाठी त्यांनी कढईत दुध तापवत ठेवलं होतं. त्यावेळी मुलगी खेळताना मोठ्या कढईत पडली. तिच्यावर देखील उपचार करण्यात आला मात्र मृत्यूशी सुरू असलेली तिची झूंज संपली आणि तिचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT