CM Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

भाजपने बेलगाम सुटलेल्या प्रवक्तांच्या डोक्यात अक्कल घालावी, आमचा संयम सुटला तर...;मुख्यमंत्र्यांचा इशारा

अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व पाहिजे, देवळात घंटा वाजवणारं नको, उद्धव ठाकरे म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद मध्ये शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज शिवसेनेची स्वाभिमान सभा होत आहे. मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या सभास्थानी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित शेकडो शिवसैनिकांना संबोधित केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) सांगितलं होतं, अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व पाहिजे, देवळात घंटा वाजवणारं नको. हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे नेमका काय, आमचं हिंदुत्व (hinduism) हे राष्ट्रीयत्व आहे, हृदयात राम आणि हाताला काम, असं आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. भाजपने (bjp) बेलगाम सुटलेल्या प्रवेक्यांच्या डोक्यात अक्कल घालावी. प्रवक्तांच्या वाचाळपणामुळे देशाची अब्रु जात आहे. जर तुम्ही आमच्या वर वेडीवाकडी टीका केली, तर आमचा संयम सुटला तर जशाच तसे उत्तर मिळेल, असा इशारा ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, "आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण, तुम्हाला मोजपट्टी कुणी दिली ? शिवसेनेनं आणि भाजपने आजपर्यंत हिंदुत्वसाठी काय केलं, ते एकदा होऊन जाऊद्या. बाबरी मशीद पाडली तेव्हा हे लोकं पळून गेले होते. तमाम शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेले होते. शिवाजी महाराजांच्या आधीचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही, कुणाला हिंदुत्व शिकवताय. आमचं हिंदुत्व पोकळ नाही, असं म्हणत विरोधकांच्या हिंदुत्वाचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाचार घेतला.

ठाकरे पुढे म्हणाले, विरोधकांची सत्ता गेली म्हणून आक्रोश होता, संभाजी नगरच्या पाण्यासाठी नव्हता. प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यावर तुमच्या तोंडावर काहीतरी फेकायचं आणि नंतर दिलेली आश्वासनं विसरायचं. संभाजी नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणा झालं. मेट्रोसाठी सुद्धा प्लॅन करु, पण शहाराच्या विद्रुपीकरणासाठी नाही. जे जे काम करु ते संभाजी नगरची शान वाढवणारी असेल. सत्ता गेल्यानंतर यांच्या अंगात येतं. संभाजी नगर कधी करणार, माझ्या वडीलांनी दिलेलं वचन आहे, मी विसरलो नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटकडे मंजूरी मिळाली आहे.

जेव्हा मी नामांतर करीन तेव्हा संभाजी राजांना अभिमान वाटेल, असं मी करेन, विमानतळाचा नाव छत्रपती संभाजी महाराज करायचा आहे. दिल्ली दरबारी प्रस्ताव पाठवलेला आहे. महागाई वाढले, रुपया खाली चाललय, आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण, तुम्हाला मोजपट्टीस कुणी दिलं. शिवसेनेनं आणि भाजपने आजपर्यंतच हिंदुत्वसाठी काय केलं ते एकदा होऊन जाऊद्या. बाबरी पाडली तेव्हा हे लोकं पळून गेले होते. तमाम शिवसैनिक बाबांसोबत गेले होते. शिवाजी महाराजांच्या आधीचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही. कुणाला हिंदुत्व शिकवताय. आमचं हिंदुत्व पोकळ नाही.

काश्मीरी पंडितांना घरात जाऊन गोळ्या घालतात, कार्यालयात घालतात, कुणाला काही पडली नाही. मर्द असाल तर काश्मीरी पंडितांची रक्षा करा, बाळासाहेबांनी सांगितलं होतं,अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व पाहिजे, देवळात घंटा वाजवणारं नको, कोर्टातून आदेश आला म्हणून राम मंदीर उभं राहतंय, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे नेमका काय, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, भाजपने बेलगाम सुटलेल्या प्रवेक्यांच्या डोक्यात अक्कल घालावी. जर तुम्ही आमच्या वर वेडिवाकडी टीका केली तर आमचा संयम सुटला तर जशाच तसे उत्तर मिळेल. हा वारकऱ्यांचा भगवा आहे. वारकऱ्यांचे विचार आमच्या धमण्यांत जाणार नसलीत तर काय फायदा त्या हिंदुत्वाचा ?

हिंमत असेल तर काश्मीर मध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचा. आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा , घराबाहेर पडल्यावर देश हाच माझा धर्म , असं बाळासाहेबांनी सांगितलंय. देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीवर लावला जातो. गुन्हा प्रवक्यांती केला आहे. भाजपती भूमिका देशाची होऊ शकत नाही. प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढावली आहे, हे तुम्हाला पटतंय का , आरएसएस बद्दल जे मी बोलत होतो. भाजपने सभेत भगवी टोपी घालून आले होते. भगव्या टोपीत हिंदुत्व नसतं , डोक्यात असतं. मोहन भागवतांनी घेतलीला भूमिका चांगली आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका, असं त्यांनी म्हटलं होतं.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

SCROLL FOR NEXT