औरंगाबाद मध्ये शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज शिवसेनेची स्वाभिमान सभा होत आहे. मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या सभास्थानी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित शेकडो शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबत ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आगमन व्यासपीठावर झालं आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.
यावेळी संजय राऊत म्हणाले, व्यासपीठावर आणि समोर आहेत ते सर्व शिवसेनेचे वाघ आहे. ३७ वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये शिवसेनेची शाखा सुरु झाली. तेव्हा कुणाच्या स्वप्तान नसेल की, आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाल उपस्थित राहतील, सभेला जमलेली ही विराट गर्दी म्हणजे समुद्राची उसळलेली लाट आहे. या लाटेचा तडाखा भाजपला बसला तर पाणी प्यायला उठणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर तोफ डागली.
राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेची उसळलेली समुद्राची लाट आहे. ही आंधी आहे, तुफान आहे, ही उसळलेली लाट महाराष्ट्राला नव्हे तर दिल्लील्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही, मराठवाड्याला शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे. मराठवाडा ज्याने औरंगजेबाला या मातीत गाडलं. हीच शिवसेना निजामाच्या छातीवर पाय देऊन सत्तेत आली आहे. ही गर्दी, ही शक्ती एवढच सांगते आमच्या नादाला लागू नका. काश्मीरी पंडितांचा या नामर्दांनी आक्रोश पाहावा, गेल्या दोन महिन्यात २७ काश्मीरी पंडितांची हत्या झाली.
या काश्मीरी पंडितांचा गुन्हा काय ? दिवसा ढवळ्या त्यांना मारलं जात आहे. शिवसेना आम्हाला आधार देईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला आधार देतील, अशा आशा काश्मीरी पंडीत करत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात पहिले काश्मीरी पंडीतांना आधार दिला होता. भाजपचे नेते महागाईवर प्रश्न विचारल्यावर ज्ञानवापी मशिदीबाबत बोलतात. ठाकरे सरकारनं महाराष्ट्रासह देशाला जबरदस्त दिशा दिलीय. देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आजची सभा हिंदुत्वाची गर्जना करणारी सभा आहे. हा भगवा अनंत काळ फडकत ठेवणारी आजची सभा आहे.
Edited By- Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.